प्रतिकारशक्तीमुळे रायगडमधे ८७० जण झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 12:47 AM2020-06-08T00:47:57+5:302020-06-08T00:48:29+5:30

जिल्ह्यात पॉझिटिव्ह १४०९: रविवारी नवीन ३२ रु ग्ण

Due to resistance, 870 people in Raigad were released from corona | प्रतिकारशक्तीमुळे रायगडमधे ८७० जण झाले कोरोनामुक्त

प्रतिकारशक्तीमुळे रायगडमधे ८७० जण झाले कोरोनामुक्त

Next

म्हसळा : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील ८७० रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर रविवारी ३२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह असलेल्या १४०९ झाली आहे. कोविड-१९ ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा ४२७, पनवेल ग्रामीण १६९, उरण १५२, खालापूर ५, कर्जत १३, पेण ११, अलिबाग १४, माणगाव ३१, तळा ५, रोहा १९, सुधागड १, श्रीवर्धन ९, म्हसळा १, महाड २, पोलादपूर ११ अशी एकूण ८७० आहे.

सद्यस्थितीत ४७७ पॉझिटीव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये पनवेल मनपा २५३, पनवेल ग्रामीण ६२, उरण १५, खालापूर ६, कर्जत १५, पेण १२, अलिबाग २४, मुरु ड १३, माणगाव १९, तळा ७, रोहा ४, सुधागड १, श्रीवर्धन०, म्हसळा २७, महाड १०, पोलादपूर ९ रु ग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पनवेल मनपा ३२, पनवेल ग्रामीण९, उरण १, श्रीवर्धन २, कर्जत ३, पोलादपूर १, खालापूर १, अलिबाग ३, महाड ४, तळा १, मुरुड २, म्हसळा ३ अशा एकूण ६२ नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुदेर्वाने यशस्वी होऊ शकले नाहीत. रविवारी दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत ३२ ने वाढ झाली आहे. रविवारी दिवसात पनवेल (मनपा) ३, तळा १ अशा चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातून ४ हजार ५०९ नागरिकांना कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी ३ हजार ६८ नागरिकांचे रिपोर्ट पॉंझिटिव्ह प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाºया नागरिकांची संख्या ५५ आहे.

Web Title: Due to resistance, 870 people in Raigad were released from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड