शिवजयंतीमुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:41 AM2021-02-12T01:41:16+5:302021-02-12T01:41:36+5:30
आकर्षक पुतळे दाखल
- गिरीश गोरेगावकर
माणगाव : तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक पुतळे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. हे पुतळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा १९ फेब्रुवारी जयंती उत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. घरोघरी उत्साह असतो. यानिमित्ताने शिवाजी महाराजांचे पुतळे व प्रतिमा आपल्या घरी असावी ही शिवप्रेमींची इच्छा असते. शिवजयंतीचे औचित्य साधून अनेक शिवप्रेमी आकर्षक व सुंदर आशा पुतळ्यांना पसंती देतात, ही बाब लक्षात घेऊन परराज्यातून अनेक मूर्तिकार, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा, पुतळे विक्रीसाठी घेऊन येतात. काही दिवसांवर आलेला शिवजयंती उत्सव लक्षात घेऊन राज्यातील विक्रेते छत्रपती शिवरायांचे पुतळे घेऊन आले असून ते खरेदीसाठी पसंती दिली आहे.
पाच हजार किंमत
चारशे रुपयांपासून ते पाच हजारापर्यंत या पुतळ्याची किंमत असून पीओपी व पांढऱ्या सिमेंटचा उपयोग करून ते आकर्षक रंगात बनविलेले आहेत. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने पुतळ्यांना चांगली मागणी असते. शिवप्रेमींची या पुतळ्यांना पसंती मिळत आहे.