वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:15 AM2018-05-16T03:15:31+5:302018-05-16T03:15:31+5:30

रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

Due to shortage of forests, the scarcity of scarcity reduces | वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

Next

आविष्कार देसाई 
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडक उन्हामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावते. त्यामुळे नद्या, तलाव, विहिरी, बोअरवेल या कोरड्या पडतात. यावर मात करण्यासाठी परिणामकारक ठरणारे वनराई बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहेत. १५ तालुक्यांत तीन हजार २४७ ठिकाणी बांधलेल्या वनराई बंधाºयांच्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे. यासाठी एक कोटी २६ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर ४२ हजार ७० मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.
तापमानामध्ये सातत्याने उष्णता वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भिरा येथील तापमान तब्बल ४७ अंशांपर्यंत गेले होते. उष्णता प्रखर असल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास पाणीटंचाईवर मात करणे सोपे जाते, यासाठी प्रशासनामार्फत वनराई बंधारे बांधले जातात.
पावसाळा संपल्यानंतर साधारणत: आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची प्रक्रिया सुरू केली जाते, तसेच बंधारे बांधण्यासाठी स्थानिक नागरिक श्रमदानातून हे बंधारे बांधतात. छोट्या-मोठ्या नद्या, नाले यांचे पाणी अडवले जाते.
पावसाळा संपल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असतो. त्यामुळे पावसाळा संपल्यावरच ते बांधण्यावर भर दिला जातो. हे बंधारे फक्त वर्षभरासाठीच टिकतात. पुढच्या पावसामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने तुटतात. त्यानंतर ते पुन्हा पावसानंतर उभारले जातात, ही प्रक्रिया सुरूच राहते. कमी खर्चात आणि श्रमदानातून केलेल्या या योजनेचा फायदा पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी होतो.
याच पाण्यावर रब्बी हंगामातील भाजीपाला शेती, तसेच तृण धान्य पीकलागवड केली जाते. त्याचप्रमाणे याच पाण्याचा उपयोग कुटीरोद्योग म्हणजे वीटभट्टी, मत्स्य बीज यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येता. घरगुती वापराबरोबरच पशुधन आणि पक्षी यांची तहान भागवण्यासाठीही होत आहे.
>वनराई बंधारे हे आकाराने छोटे-छोटे दिसत असले, तरी त्यांचा सकात्मक आणि परिणामकारक उपयोग होतो. यासाठीच वनराई बंधारे बांधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले. २०१७-१८ या कालावधीत तीन हजार २४७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
>जिल्ह्यात बांधण्यात आलेले वनराई बंधारे (२०१७-१८)
तालुका बांधलेले बंधारे जलसाठा (लीटर) मनुष्यबळ एकूण खर्च
रोहा ३१९ १४,३५,५०,००० ४७८५ १७,५४,५००
पनवेल ३१२ १४,०४,००,००० ४६८० १७,१६,०००
माणगाव ४१२ १८,५४,००,००० ३८५० १५,६७,०००
खालापूर २४३ १०,९३,५०,००० ३६४५ १३,३६,५००
पोलादपूर २३२ १०,४४,००,००० ३३९० १२,४९,०००
महाड २९० १३,०५,००,००० ३२१९ १२,५३,०००
अलिबाग २६० ११,७०,००,००० ३१५० ९,४५,०००
म्हसळा १८६ ८,३७,००,००० २६७० ९,८७,०००
सुधागड १७३ ७,७८,५०,००० २४६० ९,११,०००
तळा १५६ ७,०२,००,००० २३४० ८,५८,०००
पेण १५३ ६,८८,५०,००० १९०५ ७,२४,५००
मुरुड १५२ ६,८४,००,००० १९०५ ७,२३,५००
कर्जत १७५ ७,८७,५०,००० १६५० ६,७०,०००
श्रीवर्धन ११७ ५,२६,५०,००० १४५५ ५,५३,५००
उरण ६७ ३,०१,५०,००० ९७५ ३,५९,५००
एकूण ३२४७ १,४६,११,५०,००० ४२,०७० १,२६,२१,०००

Web Title: Due to shortage of forests, the scarcity of scarcity reduces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.