शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

वनराई बंधाऱ्यांमुळे टंचाईच्या झळा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 3:15 AM

रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन न केल्याने, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कडक उन्हामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावते. त्यामुळे नद्या, तलाव, विहिरी, बोअरवेल या कोरड्या पडतात. यावर मात करण्यासाठी परिणामकारक ठरणारे वनराई बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहेत. १५ तालुक्यांत तीन हजार २४७ ठिकाणी बांधलेल्या वनराई बंधाºयांच्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे. यासाठी एक कोटी २६ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर ४२ हजार ७० मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.तापमानामध्ये सातत्याने उष्णता वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भिरा येथील तापमान तब्बल ४७ अंशांपर्यंत गेले होते. उष्णता प्रखर असल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास पाणीटंचाईवर मात करणे सोपे जाते, यासाठी प्रशासनामार्फत वनराई बंधारे बांधले जातात.पावसाळा संपल्यानंतर साधारणत: आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची प्रक्रिया सुरू केली जाते, तसेच बंधारे बांधण्यासाठी स्थानिक नागरिक श्रमदानातून हे बंधारे बांधतात. छोट्या-मोठ्या नद्या, नाले यांचे पाणी अडवले जाते.पावसाळा संपल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असतो. त्यामुळे पावसाळा संपल्यावरच ते बांधण्यावर भर दिला जातो. हे बंधारे फक्त वर्षभरासाठीच टिकतात. पुढच्या पावसामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने तुटतात. त्यानंतर ते पुन्हा पावसानंतर उभारले जातात, ही प्रक्रिया सुरूच राहते. कमी खर्चात आणि श्रमदानातून केलेल्या या योजनेचा फायदा पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी होतो.याच पाण्यावर रब्बी हंगामातील भाजीपाला शेती, तसेच तृण धान्य पीकलागवड केली जाते. त्याचप्रमाणे याच पाण्याचा उपयोग कुटीरोद्योग म्हणजे वीटभट्टी, मत्स्य बीज यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येता. घरगुती वापराबरोबरच पशुधन आणि पक्षी यांची तहान भागवण्यासाठीही होत आहे.>वनराई बंधारे हे आकाराने छोटे-छोटे दिसत असले, तरी त्यांचा सकात्मक आणि परिणामकारक उपयोग होतो. यासाठीच वनराई बंधारे बांधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले. २०१७-१८ या कालावधीत तीन हजार २४७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या माध्यमातून एक अब्ज ४६ कोटी ११ लाख ५० हजार लिटर पाणी साठवण्यात यश आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.>जिल्ह्यात बांधण्यात आलेले वनराई बंधारे (२०१७-१८)तालुका बांधलेले बंधारे जलसाठा (लीटर) मनुष्यबळ एकूण खर्चरोहा ३१९ १४,३५,५०,००० ४७८५ १७,५४,५००पनवेल ३१२ १४,०४,००,००० ४६८० १७,१६,०००माणगाव ४१२ १८,५४,००,००० ३८५० १५,६७,०००खालापूर २४३ १०,९३,५०,००० ३६४५ १३,३६,५००पोलादपूर २३२ १०,४४,००,००० ३३९० १२,४९,०००महाड २९० १३,०५,००,००० ३२१९ १२,५३,०००अलिबाग २६० ११,७०,००,००० ३१५० ९,४५,०००म्हसळा १८६ ८,३७,००,००० २६७० ९,८७,०००सुधागड १७३ ७,७८,५०,००० २४६० ९,११,०००तळा १५६ ७,०२,००,००० २३४० ८,५८,०००पेण १५३ ६,८८,५०,००० १९०५ ७,२४,५००मुरुड १५२ ६,८४,००,००० १९०५ ७,२३,५००कर्जत १७५ ७,८७,५०,००० १६५० ६,७०,०००श्रीवर्धन ११७ ५,२६,५०,००० १४५५ ५,५३,५००उरण ६७ ३,०१,५०,००० ९७५ ३,५९,५००एकूण ३२४७ १,४६,११,५०,००० ४२,०७० १,२६,२१,०००