दाऊदमुळे पाकिस्तानची परिस्थिती अडकित्यातील सुपारी सारखी- ज्येष्ठ वकील उज्वल निकम

By राजेश भोस्तेकर | Published: December 18, 2023 11:53 AM2023-12-18T11:53:43+5:302023-12-18T11:54:04+5:30

अधिकृतरित्या पाकिस्तान हे मान्य करू शकत नाही की दाऊद आमच्या भूमीत आहे त्याच्यावर विष प्रयोग झाला असं निकम यांनी म्हटलं.

Due to Dawood, Pakistan's situation is like a betel nut in a trap - Senior lawyer Ujwal Nikam | दाऊदमुळे पाकिस्तानची परिस्थिती अडकित्यातील सुपारी सारखी- ज्येष्ठ वकील उज्वल निकम

दाऊदमुळे पाकिस्तानची परिस्थिती अडकित्यातील सुपारी सारखी- ज्येष्ठ वकील उज्वल निकम

अलिबाग : मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तानमध्ये विष प्रयोग झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ज्यावेळी पाकिस्तानमध्ये यादवी निर्माण होते. त्यावेळी संपूर्ण देशाची इंटरनेट बंद करण्यात येते. दाऊद हा पाकिस्तान मध्ये आहे की नाही हे सुध्दा पाकिस्तान सांगू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती दाऊदमुळे अडकीत्यातील सुपारी सारखी झाली आहे. असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांनी केले आहे. 

अलिबाग जिल्हा न्यायालयात एका केस संदर्भात ज्येष्ठ वकील उज्वल निकम उपस्थित होते. त्यावेळी दाऊद इब्राहिम बाबत उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तान ची परिस्थिती अडकित्यातिल सुपारी सारखी झाली आहे. अधिकृतरित्या पाकिस्तान हे मान्य करू शकत नाही की दाऊद आमच्या भूमीत आहे त्याच्यावर विष प्रयोग झाला आणि दुसरी बाब म्हणजे हा विष प्रयोग भारताने केला असेही बोलू शकत नाही. पाकिस्तानची भूमिका आधीपासून दाऊद आमच्या भूमीत नाही तसेच परवेझ मुशरफ हे सुध्दा भारतात आले होते तेव्हा हेच बोलले. असे ऍड उज्वल निकम म्हणाले. 

जगासमोर पाकिस्तानचे दुट्टपी बोलणे जगा समोर येऊ नये यासाठी सकाळपासूनच देशातील इंटरनेट सुविधा बंद केली आहे. हे केंव्हा घडते जेव्हा पाकिस्तान मध्ये अंतर्गत यादवी घडते किंवा पाकिस्तान मधील गोष्टी जगासमोर कळू नये त्यावेळी असे प्रकार पाकिस्तान करतो. आपल्या देशात असे घडत नाही. पाकिस्तान मधील पत्रकारांनी हे जाहीर केले आहे. त्यांनी दाऊद वर विष प्रयोग झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. अमेरिकेने ही दाऊद याला मोस्ट वाँटेड दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. कारण दाऊद हा अल कायद्याला मदत करीत होता. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी सांगितले. 

मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणात दाऊद हा आरोपी होता. दुबई येथे हा प्लॅन रचण्यात आला होता. या कटात कोणकोण सामील होता याचा खुलासा कटात सामील असलेल्या एका आरोपीला माफीचा साक्षीदार बनवून न्यायालयात केला होता. या आरोपीने कट कसा रचला, पाकिस्तान मध्ये कसे नेले, पाकिस्तान विमान तळावर आमचे पासपोर्ट कसे तपासण्यात आले नाही यावरून पाकिस्तान सरकारचे त्यांना सहाय्य होते. ही बाब स्पष्ट होते. त्यावेळी भारताशी युद्ध केल्याचा आरोप करण्यात आला नाही. मुंबई पोलिसांनी हा आरोप लावला मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. याला अनेक कारणे असू शकतात. त्यानंतर दाऊद हा दहशतवादी म्हणून हवा होता तो मिळत नव्हता. आम्ही म्हणत होतो तो पाकिस्तान मध्ये लपला आहे. मात्र ते नाकारत होते. मात्र आता लबाड लांडग्याचे पाकिस्तानचे ढोंग उघडकीस आले आहे. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.

Web Title: Due to Dawood, Pakistan's situation is like a betel nut in a trap - Senior lawyer Ujwal Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.