शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मूकबधिर मुले अंधारात

By admin | Published: October 01, 2015 11:49 PM

सरकारच्या अपंग कल्याण विभागाच्या बेफिकिरीचा फटका येथील सरकारी मूकबधिर विद्यालयाला बसला आहे. वेळेत निधी न आल्याने विद्यालयाचे सुमारे पाच महिन्यांचे लाइट बिल थकल्याने एमएसईबीने लाइट कापली

अलिबाग : सरकारच्या अपंग कल्याण विभागाच्या बेफिकिरीचा फटका येथील सरकारी मूकबधिर विद्यालयाला बसला आहे. वेळेत निधी न आल्याने विद्यालयाचे सुमारे पाच महिन्यांचे लाइट बिल थकल्याने एमएसईबीने लाइट कापली. त्यामुळे विद्यालयातील १८ विद्यार्थी अंधारातच होते. मात्र कार्यालय अधीक्षक असणाऱ्या महिलेने त्या विद्यार्थ्यांना रात्रभर स्वत:च्या घरात आसरा देत माणुसकीचे दर्शन घडविले. रायगड जिल्हा परिषदेने आपल्या पदरचे पैसे पुढे करीत मूकबधिर विद्यालयाचे ३८ हजार ६५० रुपयांच्या लाइट बिलाची रक्कम गुरुवारी चुकती केली. त्यानंतर तब्बल २७ तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला.मूकबधिर विद्यालयामध्ये २१ विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील १८ विद्यार्थी तेथील वसतिगृहामध्येच राहतात, तर उर्वरित तीन विद्यार्थी पालकांसोबत त्यांच्या घरी राहतात. या विद्यालयाचा सर्व खर्च भागविण्यासाठी सरकारच्या पुणे येथील अपंग कल्याण विभागाकडून एक रकमी सुमारे तीन लाख रुपयांचा निधी येतो. मात्र सातत्याने पत्रव्यवहार करुनही तो आलेला नाही. विद्यालयातील लाइट बिल हे एप्रिलपासून थकले होते. एमएसईबीकडूनही सातत्याने बिल भरण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. मात्र पैसेच नसल्याने ते भरणार कुठून असा प्रश्न येथील प्रभारी अधीक्षक सुवर्णा धुमाळ यांना पडला होता. बुधवारी दुपारी एमएसईबीचे कर्मचारी आले आणि त्यांनी विद्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे मूकबधिर विद्यालय अंधारात बुडाले. तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलता ऐकता येत नाही. त्यातच अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे सुवर्णा धुमाळ यांच्यातील आईचे काळीज हेलावले. त्यांनी तेथील १८ विद्यार्थ्यांना आपल्या घरी नेले. धुमाळ या त्याच इमारतीच्या परिसरात राहतात. रात्र काढल्यानंतर तातडीने वीजपुरवठा सुरु व्हावा यासाठी धुमाळ यांनी सकाळी लवकर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर जिल्हा परिषदेने आपल्या पदरचे ३८ हजार ६५० रुपयांच्या लाइट बिलाचा चेक काढल्याचे अधीक्षक सुवर्णा धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)