रुग्ण दुपटीचा कालावधी पाेचला १५६ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:20 PM2020-12-16T23:20:57+5:302020-12-16T23:21:06+5:30
नागरिकांची प्रतिकारशक्ती ठरतेय प्रभावी
रायगड : जिल्ह्यात दिवाळीनंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आराेग्य विभागाने वर्तवली हाेती. मात्र, ती निरर्थक ठरली आहे. नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढल्याने आणि सरकारी यंत्रणांनी केलेल्या विविध उपाययाेजनांमुळे रुग्ण दुप्पट हाेण्याचा कालावधी हा १५६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाचा वेग आता बऱ्यापैकी मंदावला असल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ८ मार्च राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला हाेता. त्यानंतर जिल्ह्यामध्ये काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. २१ ऑक्टाेबरपर्यंत काेराेना संसर्गाचा दुप्पट हाेण्याचा कालावधी हा सुमारे ३२ दिवसांचा हाेता. त्यामुळे काेराेनाची दहशत कायम हाेती. दिवाळीनंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याचा इशारा आराेग्य विभागाने दिला हाेता, मात्र काेराेना रुग्णांमध्ये उच्चांकी वाढ झाली नाही. जिल्ह्यातील ५९ हजार १६० रुग्णांना काेराेनाची लागण झाली हाेती. पैकी ५६ हजार ८५० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ६१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६९२ एवढीच रुग्णसंख्या आहे. सदरची आकडेवारी १५ डिसेंबर २०२० राेजीपर्यंतची आहे.सध्या रुग्ण दुप्पट हाेण्याचा कालावधी हा १५६ दिवसांवर जाऊन पाेचला आहे. त्यामुळे काेराेना संसर्गांचा धाेका म्हणावा तेवढा नसल्याचे दिसून येेते. असे असले तरी काेणतीही हलगर्जी बाळगून चालणार नाही, असेही आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे. बॉक्सआराेग्य यंत्रणेचे आवाहनकाेराेनाला दूर ठेवण्याची त्रिसूत्री नागरिकांनी कायम अंमलात आणणे गरजेचे आहे.
नियम पाळणे गरेजेचे
नाका-ताेंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम कटाक्षाने पाळणे गरेजेचे आहे. काेराेनाचे प्रमाण कमी हाेत असले, तरी पाेस्ट काेविड रुग्णांची समस्या डाेके बाहेर काढत आहे. त्यांच्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. काेणताही आजार अंगावर काढू नये असे आवाहन आराेग्य यंत्रणेने केले आहे.