विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : कोकणवासीयांचे आराध्य दैवत असणाºया गणरायाचे २५ आॅगस्टला घरोघर आगमन होणार आहे. पेण ही गणेश निर्मिती नगरी म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे, परंतु जिल्ह्यातील पेणवगळता उर्वरित १४ तालुक्यांमध्ये देखील ग्रामस्तरावर गणेशमूर्तींची निर्मिती होत असते. गतवर्षी जिल्ह्यात घरगुती गणपतींची संख्या ९९ हजार ७६२ होती, यंदा त्यामध्ये वाढ होवून ती एक लाखावर जाण्याचा अंदाज गणेश मूर्तिकारांचा आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांत छोट्या व मोठ्या सुमारे ८०० गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा असून या उद्योगात मूर्तिकार व अन्य कारागीर असे सुमारे २० हजार जण व्यस्त असतात, अशी माहिती अलिबागजवळच्या रामनाथ येथील गणेश कला मंदिरचे संचालक व मूर्तिकार भरत नांदगावकर यांनी दिली आहे.जिल्ह्यात घरोघर आगमन होणाºया एक लाख गणपतींची संख्या विचारात घेतली आणि मूर्तीची सरासरी किमान किंमत ५०० रुपये जरी धरली तरी जिल्ह्यात गणेश निर्मिती उद्योगात सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल असल्याची माहिती अलिबाग, रोहा, मुरुड आदि ठिकाणच्या मूर्तिकारांशी चर्चा करताना उपलब्ध झाली आहे.गावांतील गणेशमूर्तिकार आणि ग्रामस्थ यांचे पिढ्यान्पिढ्याचे नाते असते. सर्वसाधारणपणे नागपंचमीच्या दिवशी आपल्या गणपतीचा पाट गणेशमूर्ती कार्यशाळेत देवून आपल्या मूर्तीवर शिक्कामोर्तब करण्याची पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून असल्याचे गणेशमूर्तिकार शरद नांदगावकर यांनी सांगितले. हा एकमेव आर्थिक व्यवहार असा आहे की येथे मालाचा भाव केला जात नाही. मूर्तीची जी किंमत मूर्तिकार सांगतात ती किंमत देवून गणपती बाप्पांना आपल्या घरी घेवून जातात. या विश्वासामुळे गणेशमूर्तींची किंमत देखील मूर्तिकारांना वाजवीच ठेवावी लागते. येथे व्यवहारापेक्षा भक्तीच्या आणि विश्वासाच्या भावनेची किंमत मोठी असल्याचे भरत नांदगावकर यांनी सांगितले.पेणच्या गणेशमूर्ती इतर तालुक्यातील बाजारपेठेत विक्र ीसाठी येत असल्या तरी स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्तींना मागणी आहे.
गणेश निर्मिती कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:56 AM