अलिबाग-गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या भक्तांच्या वाहनाला कोठीही हानी पोहोचू नये म्हणून रायगड पोलिसांनी विषेश खबरदारी घेतली होती. वडखळ ते महाड दरम्यानच्या रस्त्यात होणाऱ्या पंक्चर गाड्यांना तात्काळ स्टेपनी बदलण्यासाठी स्वता पोलिस कर्मचारी वाहन चालकाला मदत करीत होते. तर काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या सहाय्याने बंद पडलेल्या चारचाकी, तिनचाकीसह दुचाकीचे काम करून त्या सुरु करीत होते. मागील 15 दिवसात गणेश भक्तांची सुमारे 227 वाहन ड्युटी बजावित असलेल्या पोलिसांनी स्वता दुरूस्त केली आहेत.
एकीकडे पोलिस म्हटल की सारेजण लांब पळत असत, मात्र सध्या रायगड पोलिसांनी सकारात्मकपणे नागरीकांना मदत केल्याने पोलिसांना देव मानू लागले आहेत. सामान्य माणासाच्या समस्या सोडणविण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे नेहमिच अग्रही असल्याने नागरीक मोठ्या आशेनेच त्यांच्याकडे जातात. याच धरतीवर गणेशोत्सवादरम्यान नागरीकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मागील 15 दिवसांपासून रायगड पोलिसांनी कंबर कसली होती. तर कोकणात जाणाऱ्या भक्तांना कोणतीही समस्या येऊ नये यासाठी पोलिस, सुविधा केंद्र अशा विविध उपाय-योजना करण्यात आल्या होत्या.
17 ते 18 सप्टेंबर दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या अधिकच वाढली होती. यावेळी एखादी गाडी पंक्चर झाली वा बंद पडली तर ट्रफीक सारख्या समस्येला सामोर जाव लागत होती. ट्रफीकची समस्या सोडविण्यासाठी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कर्मचारी स्वता भक्तांच्या पंक्चर गाड्यांच्या स्टेपनी बदलून देत होते. तर काही पोलिस कर्मचारी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या सहाय्याने बंद पडलेल्या गाड्या सुरु करून देताना दिसत होते. त्यामुळे सामान्य माणूस आणि पोलिस यांच्या दरी दुर होण्यास मदत झाली आहे.बंदोबस्तासाठी असताना गणेशभक्तांच्या गाड्या पंक्चर होत असत. त्यामुळे काही ठिकाणी ट्रफिक होत असे, हे ट्रफीक कमी करण्यासाठी आम्ही स्वता मॅकनिक बनुन गाडीची स्टेपणी बदलत होतो. त्यामुळे वाहन चालवून थकलेल्या चालकाला ही आराम मिळत होता, तर दुसरीकडे त्यांचे मिळणार आशिर्वाद आमच्यासाठी महत्वाचे होते. - अभिजित पोटे, हवालदार.
घरात गणपती असूनही मागील दहा दिवस आमचे कर्मचारी नागरीकांचे सेवेसाठी रस्त्यावर उभे होते. काही पोलिस कर्मचाऱ्यांना घरच्या गणपतीचे दर्शन ही घेता आले नाही. मात्र नागरीकांची सेवा करणे हाच गणेशाचा मोठा अशिर्वाद असल्याचे सांगत होते. तर स्वता एक अधिकारी म्हणून जेव्हा भक्तांची मदत करीत असतानाच आम्हाला मदत केलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावरील हासूतच बाप्पाचे दर्शन झाले. - अतुल झेंडे, अपर पोलिस अधिक्षक.गणेशोत्सव हो कोकण वासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वीच संपुर्ण नियोजन केले होते. या नियोजनासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रोल महत्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी आपल्या ड्युटी व्यतिरीक्त गणेश भक्तांना केकेली मदत वाखाण्याजोगी आहे. तर परतणाऱ्या गणेशभक्तींनी ही पोलिसांचे मनपुर्वक अभिनंदन केले.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.