ध्वजारोहणप्रसंगी महिला सरपंचाला डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:49 PM2019-01-28T23:49:06+5:302019-01-28T23:49:41+5:30

नाराज ग्रामस्थांचा ग्रामसभेवर बहिष्कार; म्हसळा तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

During the hoisting of the flag, the women sarpanchala davale | ध्वजारोहणप्रसंगी महिला सरपंचाला डावलले

ध्वजारोहणप्रसंगी महिला सरपंचाला डावलले

googlenewsNext

म्हसळा : लोकप्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन साजरा करताना ध्वजारोहण करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. हा अधिकार काही राजकारण करणारे महाभाग हिरावून घेत असल्याच्या घटना हल्ली निदर्शनास येत आहेत. म्हसळा तालुक्यातील नेवरूळ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आर्या महागावकर, उपसरपंच नामदेव महाडिक हे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी कार्यक्र माला उपस्थित असताना त्यांच्या हस्ते ध्वजारोहण न करता सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच यांचा ध्वजारोहण करण्याचा मान असताना त्यांचा हा मान राजकीय दबावाखाली हिरावून घेतला असल्याची खंत नेवरूळ ग्रामस्थांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. याच दिवशी होणाºया ग्रामसभेला ग्रामस्थांनी उपस्थित न रहाण्याचा निर्णय घेतला. ही घटना लोकशाहीचा व महिला लोकप्रतिनिधी यांचा अवमान असल्याने ग्रामस्थांनी म्हसळा तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

गावात महिला सरपंच असताना त्यांच्याच उपस्थितीत त्यांच्या पदाचा अवमान केला असल्याची भावना ध्वजवंदन कार्यक्र म झाल्यानंतर नेवरूळ ग्रामस्थांनी व्यक्त केली. नव्याने नेवरूळ ग्रामपंचायतीचा कारभार दबावाखाली चालत असून ही मनमानी आहे त्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. सरपंच आर्या महागावकर यांच्यावर गावातील शिवसेनेच्या राजकीय पुढाºयांचे दबावतंत्र होत असल्याचे त्यांना त्यांचे मर्जीने काम करू दिले जात नाही हेच या कार्यक्र मातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकशाहीचा व महिला लोकप्रतिनिधी यांचा अवमान असल्याने ग्रामस्थांनी म्हसळा तहसीलदार रामदास झळके,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभे यांच्याकडे तक्र ार केली.

ध्वजारोहण कार्यक्र मावेळी नेवरूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शंकर म्हेत्रे उपस्थित होते, त्यांना सरपंच उपस्थित असताना ग्रामपंचायतीत ध्वजारोहण सदस्यांनी का केले असे विचारले असता म्हेत्रे यांनी सरपंच यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले होते, पण त्यांनी सदस्य स्वप्निल लाड हे ध्वजारोहण करणार आहेत असे सांगितल्याचे स्पष्ट के ले.

Web Title: During the hoisting of the flag, the women sarpanchala davale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच