महामार्गावर खड्डयांसह धुळीचे विघ्न

By admin | Published: August 18, 2016 04:41 AM2016-08-18T04:41:40+5:302016-08-18T04:41:40+5:30

महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरु न प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी चांगलीच

Dust disruption with pits on the highway | महामार्गावर खड्डयांसह धुळीचे विघ्न

महामार्गावर खड्डयांसह धुळीचे विघ्न

Next

धाटाव : महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरु न प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकांना रस्ता शोधताना मात्र कसरत करावी लागत आहे. तर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यावर आता धुळीने दहशत पसरविल्याने वाहनचालकांना खड्डयांसह धुळीचा सामना करावा लागत आहे.
कोकणात गणेशोत्सव सणाला मोठे महत्त्व आहे. किमान १५ दिवस अगोदर गणरायाच्या आगमनासाठी मुंबई, गुजरातसह इतर ठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास असणारे चाकरमानी गावाकडे धाव घेतात. तर पेण, वडखळ येथील मोठमोठया गणेशमूर्ती नेत असताना रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्डयांचा त्रास मात्र गणरायालाही सोसावा लागत आहे. त्यातच मोठ्या उत्साहात गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास मात्र कंटाळवाणा होत आहे. मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाला आता मरगळ आल्याने रस्त्यावर जागोजागी पडलेले साहित्य लगतच्या गावातील दुचाकीस्वारांना रहदारीला अडथळा ठरत आहे. काही ठिकाणी सुरिक्षततेबाबत उपाययोजनेची कमतरता असल्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. तर अवघ्या ४ ते ५ दिवसांपूर्वी पुगावनजिक रस्त्यावर पेव्हर ब्लॉक अस्ताव्यस्त पसरल्या असून नंदकुमार झोलगे यांना रात्री न दिसल्याने त्या ठिकाणी अपघात घडूनत्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाल्याची घटना घडली. तर १५ दिवसांपूर्वी एक कंटेनर रस्त्यात पलटी झाल्याने चालकाला किरकोळ दुखापत होऊन वाहतूक खोळंबली होती.
सध्या धो-धो कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने चिखलमय झालेल्या रस्त्यावर आता मातीचा धुरळा निर्माण झाला आहे. महामार्गावर सुकेळी खिंडीपासून कोलाड (वरसगाव) दरम्यानच्या अंदाजे पाच किमीच्या अंतरावर अक्षरश: धुळीने थैमान घातले आहे. याचा त्रास दुचाकीस्वारांना मोठयाप्रमाणावर होत आहे. रस्त्यावरु न खड्यांबरोबर धुळीचा सामना करीत मार्गक्र मण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.तर रस्त्यावरील वाहतूक धिम्यागतीने होत असल्याने वाहनचालक तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dust disruption with pits on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.