प्रत्येक तालुक्यास देणार कार्डिओग्राफ अ‍ॅम्ब्युलन्स - अनंत गीते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:04 AM2018-12-31T00:04:45+5:302018-12-31T00:05:04+5:30

रायगड जिल्ह्यात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. पर्यटकांच्या आगमनाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

Each taluka will give cardioagraph ambulance - Anant Geete | प्रत्येक तालुक्यास देणार कार्डिओग्राफ अ‍ॅम्ब्युलन्स - अनंत गीते

प्रत्येक तालुक्यास देणार कार्डिओग्राफ अ‍ॅम्ब्युलन्स - अनंत गीते

Next

मुरुड जंजिरा : रायगड जिल्ह्यात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. पर्यटकांच्या आगमनाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पर्यटकांना व स्थानिक नागरिक यांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून जानेवारी महिन्यात रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांना कार्डिओग्राफ अ‍ॅम्ब्युलन्स देऊन उत्तम आरोग्य सेवा देणार आहे. या एका अम्ब्युलन्सची किंमत ५१ लाख रु पये असून, लवकरच प्रत्येक तालुक्यास ही अ‍ॅम्ब्युलन्स देणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरुड पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली.
व्यासपीठावर आमदार पंडित पाटील, मुरु ड नगराध्यक्ष स्नेहा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपप्रमुख प्रशांत मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, बाळशेठ लोखंडे, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, उपनगराध्यक्षा नौशीन दरोगे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मुरुड तालुकाप्रमुख हृषीकांत डोंगरीकर, पर्यटन व नियोजन सभापती पांडुरंग आरेकर, बांधकाम सभापती अशोक धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकू, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे व सर्व नगरसेवक मान्यवर उपस्थित होते.
मुरु ड पर्यटन महोत्सवासाठी सहा लाख रु पये देणार असल्याची घोषणा या वेळी गीते यांनी केली. मुरु ड ला लवकरच पर्यटनाचा ‘ब’ दर्जा मिळणार असून, सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पर्यटक व स्थानिकांना सहज उतरता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासन यांच्याकडून निधी उपलब्ध झाला असून, सदरचे काम टेंडर प्रक्रि येत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मुरु डला पर्यटकांच्या सोईसाठी स्वच्छतागृह व चेंजिंग रूम झाल्या आहेत, तशीच सुविधा अलिबाग किनाऱ्यावरही उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पर्यटन महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी मुरुड नगरपरिषदेचे विशेष कौतुक केले.

Web Title: Each taluka will give cardioagraph ambulance - Anant Geete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.