रायगडचे पक्षी अभ्यासक मेस्त्री यांच्या गरुड अभ्यासाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:42 AM2018-09-12T02:42:53+5:302018-09-12T02:42:55+5:30

रशिया रॅप्टर्स रिसर्च कॉन्झर्वेशन नेटवर्क या आंतरराष्ट्रीय पक्षी अभ्यासक संस्थेच्या वतीने रशियातील अल्ताई येथे दुसऱ्या जागतिक शिकारी पक्षी शास्त्रीय अभ्यास आणि प्रात्यक्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Eagle study of Raigad's bird surgeon Mestri | रायगडचे पक्षी अभ्यासक मेस्त्री यांच्या गरुड अभ्यासाची दखल

रायगडचे पक्षी अभ्यासक मेस्त्री यांच्या गरुड अभ्यासाची दखल

Next

अलिबाग : रशिया रॅप्टर्स रिसर्च कॉन्झर्वेशन नेटवर्क या आंतरराष्ट्रीय पक्षी अभ्यासक संस्थेच्या वतीने रशियातील अल्ताई येथे दुसऱ्या जागतिक शिकारी पक्षी शास्त्रीय अभ्यास आणि प्रात्यक्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत महाड येथील सिस्केप संस्थेचे संस्थापक, देशातील पहिल्या व्हल्चर (गिधाड) रेस्टोरंटचे जन्मदाते, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री यांच्या ‘भारतीय गरुड’ अभ्यासाच्या सादरीकरणाने बाजी मारली
आहे.
दुसºया जागतिक शिकारी पक्षी शास्त्रीय अभ्यास आणि प्रात्यक्षिक परिषद ६ सप्टेंबर रोजी सुरू झाली असून, ती १३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पोलंड, हंगेरी, फिनलंड, इंग्लंड, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया, अमेरिका, इजिप्त, इस्नईल, तुर्क स्तान, कझाकीस्तान, रशिया आदी जगभरातील एकूण १२५ देशांतील पक्षी शास्त्रज्ञ व अभ्यासक या परिषदेत आपापल्या देशातील गरुड पक्षांविषयीचे अभ्यापूर्ण वैज्ञानिक प्रकल्प सादर करीत असल्याचे मेस्त्री यांनी पुढे सांगितले.
गेल्या चार दिवसांत एकूण ६२ देशांतील पक्षी शास्त्रज्ञ व अभ्यासक यांनी आपले प्रकल्प स्लाइड शोज, पोस्टर्स प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडले आहेत. यामध्ये भारतात किनारी-खाडीपट्ट्यांत हिवाळी स्थलांतर करून येणारे आॅस्प्रे इगल्स, इंपेरिअल इगल, स्टेप्पी इगल्स, ग्रेटर स्पॉटेड इगल्स, गोल्डन इगल्स आदी एकूण ६३ जातींच्या गरुडांचा समावेश असून, त्यांच्या अस्तित्वाबाबतचे संपूर्ण सादरीकरण करण्यात आले. रशियातील या परिषदेचे मूळ संवाद माध्यम रशियन भाषा हेच आहे. मात्र, मेस्त्री यांना इंग्रजी ट्रान्सलेटरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.

Web Title: Eagle study of Raigad's bird surgeon Mestri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.