‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशा जयघोषाने जिल्ह्यात ठिकठिकाणी सात दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला, तर गौरींचेही विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्तींची वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी विसर्जन तलावावर, समुद्रकिनारी बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी के ली होती.कर्जतमध्ये २६०८ गौरार्इंचे विसर्जन, पावसाने दडी मारल्याने उत्साहकर्जत : तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५९७६ गणरायांना व २६०८ गौरींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गुरुवारी सकाळपासून पावसाने दडी मारल्याने भाविकांना थोडासा दिलासा मिळाला.कर्जतमधील मुस्लीम बांधवांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांचे पुष्पगुच्छ देऊन आलिंगनाने स्वागत केले, तर नेरळमधील मुस्लीम बांधवांनी मशिदीसमोरून जाणाºया गणरायावर पुष्पवृष्टी के ली. ही परंपरा अजूनही सुरू ठेवून यंदाही सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले. कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ३८३० व सार्वजनिक ७ गणरायांचे, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी २०८३, सार्वजनिक २, तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ५३, सार्वजनिक एक अशा एकूण खासगी ५९६६ व सार्वजनिक १० गणरायांचे आणि तालुक्यातील एकूण २६०८ गौरींचे विसर्जन करण्यात आले.मिरवणुकीत तरु णाईचा जल्लोषआगरदांडा : ‘एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार’, ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा भावपूर्ण घोषणांत ढोल-ताशांच्या गजरात लेझीम-झांज वादनाच्या झंकारात, रंगीबेरंगी फटाक्यांची आसमंतात उधळण करीत, मंगलमय वातावरणात गौरी-गणपतीला संपूर्ण तालुक्यात गणेशभक्तांनी निरोप दिला.विसर्जनाच्या जल्लोषात मिरवणुकीत तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील २२५७ गणपती व ३५० गौरींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी मुरु ड पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गणरायाला निरोपमोहोपाडा : सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे शुक्र वारी तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. मात्र, गेले अनेक दिवस पावसाचे आगमन होतच असल्यामुळे जणूकाही बाप्पावर वरुणराजा अभिषेक करीत असल्यामुळे प्रत्येकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे अवघड झाल्याचे चित्र होते. दीड दिवसांच्या व पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना पाऊस शांत होईल. मात्र, ही आशा फोल ठरली. पावसाने सातव्यादिवशी उसंत घेतल्यानेमोहोपाडा तलाव, पाताळगंगा नदी, रिस पूल, वावेघर घाट, गुळसुंदे आदी ठिकाणी वाजत-गाजत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.गणपती विसर्जनानंतर गौरार्इंचे पारंपरिक गीतांच्या तालावर पाताळगंगा नदीवर भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया,पुढल्या वर्षी लवकर या’, ‘गौरीमाते की जय’च्या जयघोषात रसायनीत गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडली जावी, यासाठी खबरदारीही भाविक घेत होते. विसर्जनस्थळावर गणेशभक्तांची गर्दी झाली होती.सात दिवसांच्या बाप्पाला, तसेच गौरार्इंना गणेशभक्तांनी भक्तिभावाने भावपूर्ण निरोप दिला. या वेळी विसर्जनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रसायनी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त केला होता.रोहा तालुक्यात १००४ बाप्पा, २९५ गौरार्इंचे विसर्जनरोहा : तालुक्यात १००४ बाप्पांसह २९५ गौरार्इंचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या आणि टाळ, मृदुंगाच्या गजरात गणेशभक्तांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप दिला. या वेळी शहरातील विसर्जन स्थळांवर गर्दी झाली होती.उत्सव काळात पावसाने विश्रांती घ्यावी अशी भक्तांची धारणा असते. गणरायाच्या आगमनापासून जिल्ह्यात सर्वत्र वरुणराजा धुवाधार कोसळत होता. बुधवारी पावसाने थोड्या फार प्रमाणात उघडीप घेत नागरिकांना तब्बल पाच दिवसांनी सूर्यदर्शन घडविले. परिणामी गौरी-गणपतीच्या विसर्जनात भक्तगणांत मोठा उत्साह दिसून आला. गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फेविसर्जन स्थळांवर सर्वत्र स्वच्छता, मदतीची चोख व्यवस्था, निर्माल्य कलश आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारनंतर वाजतगाजत गुलाल उधळत लेझीम, टाळ मृदुंग, ढोल-ताशाच्या गजरात आणि डीजेच्या तालावर गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती.एकामागून एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदीकिनारी निघाले होते. हातगाडी तसेच खासगी वाहनांनी विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांना पाहण्यासाठी मुख्य हमरस्त्यावर जनसमुदाय लोटला होता. या वेळी उसळलेल्या गर्दीच्या नियोजनासाठी रोहा पोलिसांनी विशेष पोलीस व्यवस्थाही ठेवली होती.१४४३ गौरींना निरोपश्रीवर्धन : गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..., गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला..., मंगलमूर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...च्या गजरात गुरु वारी भावपूर्ण वातावरणात श्रीवर्धन तालुक्यातील गौरी-गणपतींना निरोप देण्यात आला.शुक्र वारी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणताना जितका आनंद झाला होता त्याच्यापेक्षा जास्त दु:ख गुरुवारी गौरी-गणरायांचे विसर्जन करताना भक्तांना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. श्रीवर्धन तालुक्यात एकूण४७४० गणपती तर १४४३ गौरींचे विसर्जन करण्यात आले.श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण २२४० गणपतींचे तर ५४३ गौरींचे तर दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये २५०० गणपती तर ९०० गौरींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शुक्र वारी विराजमान झालेल्या गौरी-गणरायांना गुरु वारी संध्याकाळी भावपूर्ण अशा वातावरणात मंगलमूर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...च्या गजरात काहीशा नाराजीच्या सुरात निरोप देण्यात आला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पराग लोंढे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.‘बाप्पा मोरया’चा जयघोषअलिबाग : सात दिवसांच्या बाप्पासह गौरींचे गुरु वारी वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ८८ सार्वजनिक, तर ५७ हजार १६६ खासगी गणेशमूर्तींचा समावेश होता. बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी समुद्रकिनाºयासह नदी, तलाव या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अलिबागमध्ये विविध मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशा आणि खालूबाजाच्या ठेक्यावर तरुणाईसह आबालवृद्धांची पावले ताल धरून नाचत होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने अलिबागचा परिसर दुमदुमून गेला होता.शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाच्या मूर्तीची जिल्ह्यात विविध ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दुपारनंतर लगबग सुरू होती. सायंकाळी बाप्पाच्या मूर्तींसह गौरीचे विसर्जन करण्यासाठी भक्त विसर्जन स्थळी निघाले.स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली होती. खासगी गणेशमूर्तींची संख्या जास्त असल्याने काहींनी आपापल्या वाहनांतूनच बाप्पाच्या मूर्तींना विसर्जनस्थळी नेले.महाड तालुक्यात ३,४५२ गणरायांना भावपूर्ण निरोपलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड तालुक्यातील शहरी, तसेच सर्व ग्रामीण भागात सात दिवसांच्या ३४५२ गणपतींना, तर ९९२ गौरार्इंना गणेशभक्तांकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनानिमित्ताने तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या नदीकाठांवर, तसेच ओढ्यांवर गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.महाड तालुका हा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वसलेला आहे. ग्रामीण भागात गौराई आणण्याची परंपरा तसेच ओवशाची परंपरा आजही कायम आहे. ग्रामीण भागात असलेल्या नद्या, तसेच ओढ्यांमध्ये सात दिवसांच्या गणपतींचे तसेच गौराईचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. महाड तालुक्यात ३४५२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १९ सार्वजनिक गणपती वगळता, बाकी सर्व घरगुती होते. मंगळवारी गणपतीची आई गौराईचे आगमन झाले. बुधवारी ओवशाचा सण साजरा करण्यात आला. तर गुरु वारी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासोबत ९९२ गौरार्इंनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला. गौराई आणण्याची परंपरा आजदेखील मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात कायम आहे. त्यामुळे सात दिवसांच्या गणपती विसर्जनाला मोठ्या प्रमाणात मान दिला जातो.महाड तालुक्यात गुरुवारी दुपारी ३ वा.पासूनच गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली. पाच दिवस लागणाºया सततच्या पावसाने दोन दिवस उघडीप घेतल्याने विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी पावसाचे विघ्न आले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खालू बाजासह मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. संपूर्ण तालुक्यात दुपार ते संध्याकाळ उशिरापर्यंत गणरायाचे विसर्जन सुरू होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर गर्दी
पुढच्या वर्षी लवकर या..., विसर्जन स्थळांवर गर्दी : सात दिवसांच्या बाप्पासह गौराईला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:24 AM