इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना परराज्यात मागणी
By Admin | Published: September 3, 2016 02:47 AM2016-09-03T02:47:45+5:302016-09-03T02:47:45+5:30
शाडूच्या मातीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करीत गणेशभक्तांना त्यांच्या मागणीनुसार पर्यावरण संवर्धनासाठी शाडूच्या गणेशमूर्ती कला केंद्राचा गणेशोत्सवात आलेल्या
- दत्ता म्हात्रे, पेण
शाडूच्या मातीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करीत गणेशभक्तांना त्यांच्या मागणीनुसार पर्यावरण संवर्धनासाठी शाडूच्या गणेशमूर्ती कला केंद्राचा गणेशोत्सवात आलेल्या मागणीनुसार बनविण्याकडे मंगेश कला केंद्राचा गणेशोत्सवात भर आहे. आजवर तब्बल ५ हजार ते ५ हजार ५०० पर्यावरणपूरक छोट्या-मोठ्या गणेशमूर्ती गोवा, गुजरातसह पुणे व राज्यभरात वितरीत झाल्याची माहिती मंगेश कला केंद्राच्या कार्यशाळेतील कलाकारांनी दिली. गणेशमूर्ती व्यवसायात दुसरी पिढी कार्यरत असून जास्तीत जास्त छोट्या व मध्यम आकाराच्या सुबक मूर्तीची ठेवण या कार्यशाळेत पहावयास मिळते.
देशांतर्गत व विदेशातील चार ते पाच लाख मूर्तीची मागणी पकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या गणेशमूर्तींची पूर्तता आणि बनविण्याचे काम अवघड आहे. मात्र आॅर्डरनुसार पेणच्या कार्यशाळांमध्ये काही प्रमाणात इकोफे्रं डली गणेशमूर्ती तयार केल्या जातात. हा आकडा दोन ते अडीच लाखांच्या घरात जाईल एवढाच आहे. मात्र यातील निष्णात मूर्तिकारांची पहिली पिढी कालपरत्वे वयोमानानुसार कालवश झाली आहे. तरीही शाडूच्या गणेशमूर्तींचे महत्त्व व पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी आहे. गणेशभक्तांना भावणाऱ्या मूर्तिकलेची नवी पिढीही याच उमेदीने कार्य करीत असून मंगेश कला केंद्रामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्माण करण्यावर भर असतो. सध्या कार्यशाळेत आकर्षक अशा गणेशमूर्ती गणेशभक्त घरी नेत आहेत.
शाडूची माती
सहज विरघळते
नैसर्गिक घटक असलेल्या शाडूची माती नदीपात्रात किं वा अन्य जलाशयात सहज विरघळते, त्यामुळे पर्यावरणपूक अशा या गणेशमूर्ती आहेत. याशिवाय गणेशभक्तांना मूर्तीच्या विसर्जनानंतर मूर्तीचे विसर्जन योग्य प्रकारे झाल्याचा एक देवाप्रति असलेला भाव यामुळे पर्यावरणपूरक शाडूची गणेशमूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा ओढा आहे, असे कार्यशाळेतील मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे सगळ्यांचाच भर आहे. मात्र शाडूच्या गणेशमूर्ती बनविणे त्यानंतर त्याची रंग लावताना होणारी हाताळणी ते वितरण व्यवस्थेपर्यंत फार जबाबदारीचे काम आहे. शाडूच्या गणेशमूर्ती आकाराने छोट्या असल्या तरीही वजनाने प्लास्टर आॅफ पॅरिसपेक्षा तिपटीने जड असतात. या गणेशमूर्तींना कार्यशाळेत वर्षभर सांभाळणे म्हणजे शिशू विकास मंदिरासारखे नाजूक काम, तरीही बाप्पाच्या उत्सवाची शास्त्रशुद्ध पूजा म्हणून काही गणेशभक्तांना आपल्या घरची गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासूनच बनविलेली लागते. सध्या गणेशोत्सवाचा मेगा इव्हेंट व बाप्पाच्या फॅन्सची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात तब्बल २५ लाखांच्या वर गणेशमूर्तींची मागणी आहे.