पनवेल : पनवेलसारख्या सिमेंटच्या जंगलात आपले वेगळे रूप जोपासले. कर्नाळा अभयारण्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या ठिकाणाला पर्यटकांची वाढती पसंती लक्षात घेता, या ठिकाणी इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. या बाबत नुकतेच नागपूर येथे निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीत आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.मुंबईपासून ६३ कि.मी. अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईनजीक थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील कर्नाळा अभयारण्याची ख्याती आहे. या ठिकाणी सुमारे १२५ ते १५० जातीचे देशी-विदेशी वेगवेगळे पक्षी आहेत. यामध्ये मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीन ससाणा, टिटवी, बगळे आदीचा समावेश आहे. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते.तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे, ससे, बिबट्या, डुकर आदी प्राणीही आढळतात. नितांत शांतता असलेल्या या पर्यटन ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावत असतात. या सर्व बाबीचा विचार करून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, ठाणे येथील वन्यजीव संरक्षण अधिकारी दादासाहेब शेडगे यांनी पुढाकार घेऊन इको या ठिकाणी टुरिझमची संकल्पना मांडली आहे, त्यानुसार वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर यांनी आराखडा तयार केला आहे. २०१८-२१ या कालावधीत इको टुरिझम अस्तित्वात येईल, असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.ट्रेकिंग न करणाºया पर्यटकांना ९ डी थिएटरचा अनुभवकर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर आहे. दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुर स्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढताना तटबंदी लागते. त्यातून आत प्रवेश केला की, खालून अंगठ्यासारख्या दिसणाºया सुळक्याची भव्यता जाणवते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात.नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे. मात्र वयोवृद्ध, अपंग त्याचबरोबर महिलांना ट्रेकिंग करता येणे कठीण आहे, अशांना कर्नाळा किल्ल्यांची संरचा अनुभव ९ डी थिएटरमध्ये घेता येणार आहे. त्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कर्नाळा अभयारण्यात लवकरच इको टुरिझम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 12:24 AM