पनवेलमध्ये गोदामावर छापा टाकून खाद्यतेल जप्त
By Admin | Published: October 1, 2016 10:50 PM2016-10-01T22:50:17+5:302016-10-01T22:50:17+5:30
ग्राहकांची फसवणूक करुन विक्री करीता सज्ज असलेल्या तब्बल 94 लाख 66 हजार 145 रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा पनवेलमध्ये जप्त करण्यात आला.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
जयंत धुळप, दि. १ - मधुमेह, कोलेस्टोरॉल,:हदय विकार, कॅन्सर आणि त्वचारोग यांना प्रतिबंध करण्यात अत्यंत प्रभावी अशी ग्राहकांची दिशाभूल करणारी माहिती खाद्यतेलाच्या पॅकेट्स वर छापून त्या तेलाचा पुरवठा करुन ग्राहकांची फसवणूक करुन विक्री करीता सज्ज असलेल्या तब्बल 94 लाख 66 हजार 145 रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा पनवेल तालुक्यांतील आदिवली गावांतील मे.अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या गोदामावर धाडसी छापा घालून अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने गुरुवारी जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे ठाणे येथील सह आयूक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांच्या नेतृत्वाखालील अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे व सुप्रिया जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मे.अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या गोदामातुन ग्राहकांची दिशाभुल करणारी जाहिरात करून खादय़तेलाचा पुरवठा होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर, त्याची खातरजमा करुन हा छापा टाकण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त दिलिप संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.
दिशाभूल करणारा मजकूर, नऊ नमूने रासायनिक विश्लेषणास रवाना, रितसर कारवाई करणार
अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीच्या या गोदामाची तपासणी केली असता येथे ‘फाॅर्चून राईस ब्रान ऑईल फाॅर्चून ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल ऑईल- व्हिव्हो’ या तेलाचा साठा विक्रिसाठी ठेवल्याचे आढळले. या खादय़तेलाच्या पॅकेटवर ग्राहकांची दिशाभुल करणारा मजकुर नमुद केला असल्याचे दिसुन आल्य़ाचे संगत यांनी सांगीतले. ‘कंट्रोलिंग डायबेटीस, कंट्रोलिंग मेटॅबॉलिक डिसऑर्डर कोलेस्टेरॉल लोवरींग ऑल, हार्ट फ्रेंडली, क्लिनर व्लड व्हेसल्स, ईम्प्रूव्हज स्किन टोन, प्रोटेकश्न अगेन्स्ट डिसिजेस’ असा मजूर या पॉकेटवर छापलेला निष्पन्न झाला. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या अंतर्गत नियमाचे उल्लंघन करणारा हा मजकुर पॅकेटवर तसेच त्यासोबत असलेल्या पत्रकावर नमुद असल्याने ‘फाॅर्चून राईस ब्रान ऑईल फॉच्यरून ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल ऑईल- व्हिव्हो’ या खादय़तेलाचे 9 नमुने रासायनीक विश्लेषणाकरीता घेण्यात आले असल्याचे संगत यांनी पूढे सांगीतले. या प्रकरणी संबंधीत उत्पादकास नोटीस पाठविण्यात आली असुन उत्पादकाचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या अंतर्गत नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
उत्पादक आणि ग्राहकांना आवाहन
अन्न पदार्थाच्या पॉकेटवर अथवा जाहिरातीवर कायदयाचे उल्लंघन होईल असा कोणताही मजकुर किंवा ग्राहकांची दिशाभुल करणारा मजकुर नमुद करू नये अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या अंतर्गत नियमनुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन रायगड जिल्हयातील सर्व उत्पादकांना सहाय्यक आयुक्त दिलिप संगत यांनी केले आहे. अन्न पदार्थाबाबत कोणतीही तक्रार अथवा संशय असल्यास रायगड जिल्ह्यातील ग्राहकांनी रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या क्र.02143-252085 या दूरध्वनीवर वा टोल फ्रि क्र. 1800222365 यावर संपर्क साधावा,असे आवाहन संगत यांनी केले आहे.