शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार...
2
"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी
3
"गुंडागर्दी बस, सांगून ठेवतो तुझा हात..."; उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांना जाहीर इशारा
4
"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका
5
"बंद खोलीवाला मुद्दा"! "...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा", राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात!
7
जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?
8
अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे
9
'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल
10
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
11
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
12
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
13
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
15
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
16
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
17
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार
19
शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."
20
Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी - जिल्हाधिकारी जावळे

By निखिल म्हात्रे | Published: April 05, 2024 7:05 PM

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जावळे यांनी सांगितले.

आदिवासी क्षेत्रासाठी विशेष मोहीम

रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी समाजाचे मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. आदिवासी पाडे, वाड्या,वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जे रोजंदारी जाणारे मतदार आहेत त्यांच्या आस्थापनाशी संपर्क साधून भर पगारी सुट्टी देणे शक्य आहे का हे तपासावे. तसेच जेथे सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी दोन तासाची सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणा यांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.जिल्ह्यातील अनेक मतदार नोकरीं धंद्या बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत आहे. त्या सर्व मतदारांना मतदार चिट्ठीचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. तसेच निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.

टॅग्स :RaigadरायगडVotingमतदान