शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न

By admin | Published: October 05, 2016 3:01 AM

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काही दिवसांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी संपूर्ण राज्यात सप्ताह साजरा केला. यात महसूल विभागाने विविध उपक्रम राबविले.

जयंत धुळप, अलिबागशासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काही दिवसांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी संपूर्ण राज्यात सप्ताह साजरा केला. यात महसूल विभागाने विविध उपक्र म राबविले. मेळाव्यांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणाबाबत प्रयत्न केले. यामार्फत प्रामुख्याने महिलांचे मनोबल वाढविणे, महिलांविषयी असलेल्या योजनांची माहिती देणे,त्यांना सक्षम होण्यासाठी अवगत करणे या बाबींवर भर देण्यात आला. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कोकण विभागात झालेले महिला सक्षमीकरणाचे उपक्र म, मेळावे हे माता-भगिनींच्या सबलीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.संपूर्ण कोकण विभागात या उपक्र मांना फार मोठ्या संख्येने महिलांचा प्रतिसाद लाभला. कोकण विभागात या कालावधीत ३,४०८ विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. तर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ९,७५५ बचत खाती नव्याने उघडण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १,५६,४६० व्यक्तींचा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २६६५ आणि अटल पेन्शन योजनेत १,३४३ व्यक्तींचा नव्याने समावेश करण्यात आला. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत ३७३ व्यक्तींना लाभ देण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेत ३१९ प्रकरणे शोधण्यात येऊन त्यापैकी १९४ प्रकरणात लाभही देण्यात आला. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत मोहीम कालावधीत दाखल झालेल्या ५४ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणात मदत देण्यात आली. मनोधैर्य योजनेअंतर्गत २४ प्रकरणातील पीडितांना लाभ देण्यात आला. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत १,७०३ लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. मोेहीम कालावधीत महिलांसाठी १,३८२ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याचा ३६,६१५ महिलांनी लाभ घेतला.लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत मोहीम कालावधीत १,२८० महिलांची नावे त्यांच्या पतीच्या नावासमवेत सहहिस्सेदार म्हणून भोगवटादार दाखल केली. तसेच डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत एक लाखापेक्षा जास्त महिलांनी आपली डिजिटल लॉकर्स उघडली. असे महत्वाचे कार्य या मोहीम कालावधीत संपूर्ण कोकण विभागात झाले.रायगड जिल्ह्यातील लाभार्थीजिल्ह्यात ९९७ ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या. त्याठिकाणी जवळपास ४० हजार ८०० महिलांची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील १ हजार ८१८ कुटुंबाचे पंतप्रधान जन-धन योजनेत बचत खाते उघडण्यात आले. २ हजार २६५ पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे तर ३४१ पंतप्रधान जीवन ज्योती योजनेचे लाभार्थी झाले. २५९ अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी या काळात झाले .त्याचप्रमाणे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्र मांतर्गत राष्ट्रीय वृध्दावस्था निवृत्ती योजनांची ४२४ प्रकरणे करण्यात आली.८४ प्रकरणे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी तसेच १८६ प्रकरणे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेसाठी या काळात झाली. महत्वाच्या अशा प्रधानमंत्री मुद्रा योजनेत १०७ लाभार्थी, माझी कन्या भाग्यश्री योजनेत २८७ लाभार्थी या काळात झाले.महिला व बाल विभागाच्या योजनामहिला सक्षमीकरणासाठी केवळ शिबिरे, अथवा विशेष सप्ताहाचे आयोजन नसून महिला व बाल विकास विभागामार्फत सातत्याने वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय.सी.डी.एस.), किशोरी शक्ती योजना, राजीव गांधी सबला योजना, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, काम करणाऱ्या महिलांच्या मुलांकरिता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना, बलात्कार पीडित, लैंगिक शोषण पीडित बालक आणि हल्ला पीडितांकरिता मनोधैर्य योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, बाल संगोपन योजना म्हणजे मुलांसाठी कौटुंबिक देखभाल, बाल सल्ला केंद्र, निराश्रित महिलांसाठी आधार गृहे, अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र, महिला समुपदेशन केंद्र, शुभमंगल सामूहिक विवाह योजना.