आठ ग्रामपंचायतींचा पाणीप्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:38 PM2019-04-10T23:38:53+5:302019-04-10T23:39:00+5:30
टंचाईने हाल : पाभरे धरणाच्या कामाला सुरुवात नाही
म्हसळा : तालुक्यातील पाभरे धरणाचे पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत असून, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वास्तविक प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेश मिळाल्यानंतर कामास सुरुवात करणे गरजेचे असताना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणी खाली करण्यात आले. त्या घटनेला तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा कामाला सुरु वात झाली नाही. आता आचारसंहितेचे कारण दाखवून ठेकेदाराला कार्यादेश देता येत नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, यामुळे पाण्याअभावी जनतेचे हाल होत आहेत.
कोलाडचे कनिष्ठ अभियंता चिखलीकर यांच्या म्हणण्यानुसार जर काम करायचे नव्हते मग धरणाचे पाणी खाली करण्याची काय गरज होती? मेअखेर काम करता आले असते. प्राप्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासंबंधी या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गोडसे आणि सहायक अभियंता सचिन शिंदे यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही. ज्या कर्मचाऱ्याला येथे पाठविले जाते ते तर चक्क सांगतात की, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकार दिलेले नाहीत, तुम्ही कोलाड येथे जाऊन संपर्क करा. सध्या धरणातील पाण्याची पातळी पाहता पाणी जॅकवेल खाली गेल्याने पाणी पंप बसवून जॅकवेलला पाणी घेतल्यास पुढील काही दिवस यावर उपाय निघू शकतो; परंतु कामचुकार अधिकाºयामुळे गावांवर पाणीटंचाईची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केल्याचे या तोंडसुरे नळ पाणीपुरवठा कमिटीचे महादेव पाटील यांनी सांगितले.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिका पुरवठा उपअभियंता गांगुर्डे यांना देण्यात आल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.
च्म्हसळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना पाणीटंचाई भासत आहे. पाण्यासाठी येथील नागरिकांना भटकं ती करावी लागत आहे. त्यामुळे येथे पाण्याची काही सोय करावी, अशी मागणी होत असून कृ त्रिम पाणीटंचाईमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.