आठ हजार कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूक कामाचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:28 AM2019-04-15T00:28:28+5:302019-04-15T00:28:36+5:30
रायगड लोकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी अशा एकूण आठ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी अशा एकूण आठ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची कार्यपद्धती त्यांनी प्रत्यक्षपणे समजून घेतली. निवडणूक कालावधीत काम करताना गांभीर्याने; परंतु ताणविरहित काम करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. प्रशिक्षणाचे दुसरे सत्र शनिवारी उशिरा सर्व विधानसभा मतदारसंघात पार पडले. येथील पीएनपी नाट्यगृहात त्यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्याता आला.
निवडणूक कर्मचाºयांनी निवडणुकीचे काम सकारात्मकतेने आणि समन्वयाने करावे. केंद्राध्यक्ष हा केंद्राचा प्रमुख असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली केंद्रावरील सर्वांनी निवडणुकीचे काम करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले. निवडणूक आयोगाने प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीने काम करावयाचे आणि कुठल्या अडचणी आल्या तर कोणती कृती करायची हे व्यवस्थित दिले आहे. मतदानाअगोदर अभिरूप मतदान कसे करायचे त्याविषयीही मार्गदर्शन केले आहे. भारत इलेक्ट्रॉनिकचे तंत्रज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. व्हीव्हीपॅट मशिन आणि त्याची कार्यपद्धती, ईव्हीएम मशिन याबाबतची सर्व तांत्रिक मदत मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी, अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मतदान प्रमाण वाढीसाठी मतदारसंघात घेतले जाणारे प्रयत्न सफल होतील, असेही त्यांनी सांगितले. मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाºयांचे दुसºया टप्प्यातील प्रशिक्षण अलिबाग, पेण, महाड, दापोली, श्रीवर्धन, गुहागर येथे पार पडले. या प्रशिक्षणात पहिल्या प्रशिक्षणात झालेल्या कामांची उजळणी करण्यात आली. मतदान केंद्रावर घ्यायची खबरदारी आणि आयोगाच्या विविध सूचना याबाबत माहिती देण्यात आली. टेंडर व्होट चॅलेंज व्होट तसेच मतदान केंद्रात दिव्यांगांसाठी करावयाच्या विशिष्ट सुविधा, उन्हाळ््याच्या दृष्टिकोनातून घ्यायची खबरदारी या सर्व बाबतीत कर्मचाºयांना अवगत करण्यात आले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मायक्र ो आॅब्झर्वर अर्थात सूक्ष्म निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण सोमवारी १५ एप्रिल रोजी होणार आहे.