आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगडमधील आठ तरुणांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:57 AM2019-05-09T01:57:54+5:302019-05-09T01:58:32+5:30

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषद इंटरनॅशनल एरॉटॉनिक काँग्रेस जिच्याशी नासा, जपान, रशिया, इस्रो, चायना, युरोपियन देशाच्या अवकाश संस्था संलग्न आहेत.

Eight youths from Raigad selected for International Space Research Conference | आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगडमधील आठ तरुणांची निवड

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगडमधील आठ तरुणांची निवड

Next

वडखळ : आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषद इंटरनॅशनल एरॉटॉनिक काँग्रेस जिच्याशी नासा, जपान, रशिया, इस्रो, चायना, युरोपियन देशाच्या अवकाश संस्था संलग्न आहेत. अशा शिखर संस्थेला जगातल्या ८६ देशांतून आलेल्या ४३२० शोध निबंधातून इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशन संस्थेमधील आठ संशोधकांनी सादर केलेल्या दोन संशोधनास मान्यता मिळून त्यांचे सादरीकरण करण्यास आॅक्टोबर २०१९ मध्ये एसीने आमंत्रण दिले आहे. या आठ तरुणांपैकी सात हे रायगड जिल्ह्यातील असून एक कल्याणमधील आहे.
जगभरातील विविध संशोधक, अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे एसी समोर त्यांचे शोधनिबंध सादर करतील, त्यात आपल्या ग्रामीण भागातील हे तरुण संशोधक प्रथमच एकमेव भारतीय प्रतिनिधी म्हणून, आपले संशोधन जगातल्या सर्वोच्च अवकाशीय शिखर परिषद समोर आपले म्हणणे मांडतील. यामध्ये रिंकेश कुरकुरे, प्रज्ञेश म्हात्रे, विराज ठाकूर, हर्षवर्धन देशपांडे, भक्ती मिठागरे, वृषाली पालांडे, नमस्वी पाटील व कृपाल दाभाडे या आठ जणांचा सामावेश आहे. या आठ तरुणांपैकी सात हे रायगड जिल्ह्यातील असून रिंकेश कुरकुरे हा कल्याणमधील आहे. यात पहिला शोधनिबंध आहे टायटन या शनीच्या चंद्रासारख्या उपग्रहावरील लहरी हवामानाचा अभ्यास. कसिनी या उपग्रहाने पाठवलेल्या फोटोवरून टायटन हा पृथ्वीशी साम्य असलेला; पण मिथेन व इथेनने भरलेल्या नद्या, समुद्र डोंगर असलेला उणे १८० तापमानाचा उपग्रह ज्यावर पोहोचायला कसिनी अवकाशयानाला सात वर्षे लागली. पृथ्वी बाहेर मानवी वसाहत राहू शकेल, अशा ग्रहांच्या शोधमोहिमेतील टायटन या शनीच्या ५२ व्या चंद्राच्या पृष्ठभागावरील बदलाचा अभ्यास करून पुढची मोहीम आखण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय संस्था प्रयत्नशील आहे.
दुसरा शोधनिबंध पृथ्वी व मंगळासहित इतर ग्रह यांच्या प्रदूषित वातावरणाचे पृथक्करण करून त्यात मानवी शरीर कसे टिकावावे, याचा आहे. हे दोन्ही शोधनिबंध इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशनतर्फे सादर करण्यात आले. आपल्या ग्रामीण भागातील मुलांना जागतिक व्यासपीठ मिळावे व अवकाश तंत्रज्ञानाचा प्रसार भारतामध्ये जास्तीत जास्त व्हावा, या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘इसा’ या नोंदणीकृत संस्थेच्या दुसऱ्याच वर्षाला मिळालेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंधाची दखल घेणे म्हणजे इंजिनीयरिंग मेडिकल क्षेत्रातील डिग्रीपेक्षाही फार मोठा बहुमान असतो, ज्यावर त्या व्यक्ती अथवा संस्थेची गुणवत्ता ठरते. यात आपण कमी पडतो म्हणून आय.आय.टी. ही भारतातील सर्वोत्तम संस्था जगात पहिल्या १०० नंबरमध्ये पण नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते, असे इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशनचे सचिव सुगम ठाकूर यांनी सांगितले, म्हणूनच हे यश सुखावह व खूप मोलाचे आहे. यासाठी सायस्टिंस्ट अस्ट्रॉनॉट कँडिडेट नासा प्रणित पाटील यांचे सहकार्य खूप मोलाचे आहे.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘इसा’ ही संस्था पेण जिल्हा रायगड येथून आपले नेटवर्क चालवून रॉकेट तंत्रज्ञान, अवकाश दर्शन, स्पेस कॅम्प, असे उपक्रम व शाळा, कॉलेजमध्ये अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित विविध सेमिनारचे आयोजन करून कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय स्वखर्चाने आपला सामाजिक वाटा उचलत असते. म्हणूनच तुटपुंजा शिदोरीवर मुलांनी मारलेली ही उंत्तुग भरारी नक्कीच कौतुकास्पद असल्याचे इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशनचे सचिव सुगम ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Eight youths from Raigad selected for International Space Research Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.