एकनाथ ठाकूर अनंतात विलीन
By admin | Published: August 9, 2014 02:37 AM2014-08-09T02:37:10+5:302014-08-09T02:37:10+5:30
माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरळी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Next
>मुंबई : खासगी बँकांसह परदेशी बँकांच्या स्पर्धेत सहकारी बँकेला कॉर्पोरेट चेहरा देणारे आणि सारस्वस्त बँकेचे अध्यक्ष, माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरळी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभादेवी येथील राहत्या घरी एकनाथ ठाकूर यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रंतून हळहळ व्यक्त होत होती. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील सारस्वत बँक भवनमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेदरम्यान ठेवण्यात आले होते. या वेळी राजकीय, सांस्कृतिक, उद्योग आणि बँकिंग क्षेत्रतील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, महापौर सुनील प्रभू, खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई, भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा, अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, निवेदक प्रदीप भिडे आणि उद्योजक विठ्ठल कामत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. शिवाय सारस्वस्त बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वर्गासह बँकिंग क्षेत्रतील वर्ग या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होता. सारस्वत भवनातील अंत्यदर्शनानंतर एकनाथ ठाकूर यांच्या पार्थिवाची अंत्ययात्र वरळी येथील स्मशानभूमीर्पयत काढण्यात आली. या अंत्ययात्रेत बँकेचे अधिकारी, कर्मचारी, बँकिंग क्षेत्रतील कर्मचारी आदी सामील झाले होते. (प्रतिनिधी)