पनवेलमध्ये दारूच्या दुकानाच्या विरोधात अबालवृद्धांची निदर्शन

By वैभव गायकर | Published: October 3, 2023 04:51 PM2023-10-03T16:51:32+5:302023-10-03T16:53:06+5:30

उत्पादन शुल्क विभागाने आमच्या मागणीची दखल घेऊन या दुकानाला परवाणगी नाकारावी अशी विनंती सोसायटीचे सचिव नरेश गायकवाड यांनी केली आहे.

Elderly protest against liquor shop in Panvel | पनवेलमध्ये दारूच्या दुकानाच्या विरोधात अबालवृद्धांची निदर्शन

पनवेलमध्ये दारूच्या दुकानाच्या विरोधात अबालवृद्धांची निदर्शन

googlenewsNext

पनवेल:पनवेल रेल्वे स्टेशन समोर एनके हेरिटेज सोसायटी मध्ये सुरु होणाऱ्या दारूच्या दुकानाला येथील सोसायटीने तीव्र विरोध दर्शवला आहे.याबाबत उत्पादन शुल्क विभागालासह खासदारांना निवेदन देत सोसायटीच्या आवारात दारूचे दुकान नको अशी भूमिका घेत येथील अबालवृद्धांनी याबाबत  सोसायटीच्या आवारात निदर्शन केली.

एनके हेरिटेजमध्ये दुकान शोप नंबर 28  मध्ये हे दारूचे दुकान सुरू होत आहे. पनवेल वाईन्स नामक असे हे दारूचे दुकान याठिकाणी सुरु झाल्यास त्याठिकाणच्या शांततेवर त्याचा परिणाम होऊन याठिकाणचे स्वास्थ बिघडेल अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे.या दुकानाच्या विरोधात या एनके हेरिटेज सोसायटीने रीतसर ठराव घेत या ठरावावर जवळपास 55 रहिवाशांनी आपल्या स्वाक्षरी केल्या आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागासह  पनवेल पोलिस स्टेशन, पनवेल महानगर पालिका तसेच खासदार श्रीरंग बारणे आदींना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे.यावेळी येथील रहिवाशांनी केलेल्या निदर्शनात या सोसायटीने निषेधाचे फलक पदकावर दारूचे दुकान बंद करा, आमची सोसायटी अल्कहोल फ्री,काळे धंदे बंद करा अशा स्वरूपाच्या घोषणा देखील गांधी जयंतीच्या दिवशी दि.2 रोजी येथील बच्चे कंपनीने दिल्या.

आमचा या दारूच्या दुकानाला तीव्र विरोध आहे. गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही याबाबत शांततेत निदर्शन करून आमचा विरोध दर्शवला आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने आमच्या मागणीची दखल घेऊन या दुकानाला परवाणगी नाकारावी अशी विनंती सोसायटीचे सचिव नरेश गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Elderly protest against liquor shop in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.