अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईमध्ये प्रचाराच्या तोफा डागल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. १९ आॅक्टोबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा शेवटच्या दिवशी होणार आहे. तर दुसरीकडे सर्वच उमेदवारांच्या परिवारातील सदस्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतल्याचे दिसते. त्यामुळे दिग्गजांबरोबरच परिवाराचीही साथ उमेदवारांना प्रचारात होत आहे.
जिल्ह्यातील सातही विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने आघाडी विरोधात युती असाच सामना आहे. त्यामुळे आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी कंबर कसली आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यामध्ये हुंकार भरण्यासाठी दिग्गजांच्या सभा पार पडल्या आहेत, तर काही ठिकाणी अद्याप होणे बाकी आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना विकासाच्या मूळ मुद्द्याला बगल दिली जात असतानाही दिग्गजांच्या सभा भाव खाऊन जात असल्याचे दिसत आहे.
१९ आॅक्टोबर रोजी प्रचाराची सायंकाळी सांगता होणार आहे. त्यामुळे काही अवधीच हातामध्ये शिल्लक असल्याने उमेदवारांचे ब्रॅण्डिंग करण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रचारसभांमधून छोट्या माशांबरोबरच बडे मासेही गळाला लावण्याची स्ट्रॅटजी सुरूच असल्याचे विविध ठिकाणच्या पक्षप्रवेशावरून दिसून येत आहे.अलिबाग शेकापचे उमेदवार सुभाष पाटील यांच्यासाठी त्यांचे पाटील कुटुंब रणांगणात उतरले आहे. शिवसेनेच महेंद्र दळवी यांच्यासाठी त्यांच्या पत्नी, मुलगा मदतीसाठी उतरले आहेत.पेण शेकापच्या धैर्यशील यांच्यासाठी त्यांच्या पत्नी, भाजपचे रवींद्र पाटील यांच्यासाठी त्यांची तीन मुले, सुना, पत्नी यांचा समावेश आहे.महाड शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यासाठीहीत्यांच्या पत्नी आणि मुलांनी कंबर कसली आहे, तर माणिक जगताप यांच्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी यांनीही जोरदार प्रयत्न केले आहेत.श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अदिती तटकरे यांच्यासाठी स्वत: खासदार सुनील तटकरे,आई वरदा तटकरे, भाऊ आमदार अनिकेत तटकेर, वहिनी असा साराच परिवार उतरला आहे.कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड यांच्यासाठी त्यांची मुलगी, पत्नी, तर महेंद्र थोरवे यांच्यासाठीही त्यांचा परिवार मैदानात उतरला आहे.उरण शेकापचे विवेक पाटील यांना परिवाराची साथ आहे, तर शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या कुटुंबातील सदस्यही मेहनत घेत आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांचा परिवार मैदानात उतरला आहे.गावबैठकांवर दिला जोरच्मतदारांना आपले करण्याची कोणतीही संधी सुटणार नाही याची काळजी उमेदवारांकडून घेतली जात आहे.च्प्रचाराचे चांगलेच वावटळ उठले असल्याने प्रत्येक मतदारसंघामध्ये मात्र मतदारांना रणधुमाळी आजमावता येत आहे.च्मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी आता मतदारांकडे वेळ नसल्याने नेमून दिलेल्या पथकांमार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.च्त्याचप्रमाणे गावबैठका, वाहनाद्वारे प्रचार, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर जोर दिल्याचे दिसून येते.