निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:36 AM2018-05-26T03:36:59+5:302018-05-26T03:36:59+5:30

घरभेटी सुरु : जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींकरिता रविवारी मतदान

The election campaign stopped guns | निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत असून यासाठी सुरू असलेला प्रचाराच्या तोफा शुक्र वारी सायंकाळी थंडावल्या असून आता ‘मॅन-टू-मॅन’ संपर्कास प्रारंभ झाला आहे.
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर १८७ ग्रामपंचायतींपैकी ३९ सरपंचपद तर एक हजार ६४७ पैकी ५५३ सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यपदांच्या एकूण एक हजार १४४ जागांवर प्रत्यक्ष निवडणूक होणार असून दोन हजार ५८२ उमेदवारांची लढत होणार आहे. २७ मे रोजी मतदान होईल.
अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणाऱ्या जागा १५ असून ४७ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. सदस्य पदासाठी १५३ जागा असून ३४४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढविणार आहेत. पेणमध्ये सरपंच पदासाठी सात जागा असून २३ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ६८ जागा असून १७२ उमेदवार आहेत. मुरु डमध्ये सरपंच पदासाठी १२ जागा असून ३४ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ९७ जागा असून २३९ उमेदवार आहेत. पनवेलमध्ये सरपंच पदासाठी १४ जागा असून ३३ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ११७ जागा असून २४७ उमेदवार आहेत. उरणमध्ये सरपंच पदासाठी एक जागा असून चार उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी १७ जागा असून ३६ उमेदवार आहेत.कर्जतमध्ये सरपंच पदासाठी पाच जागा असून १२ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ३६ जागा असून ७५ उमेदवार आहेत. खालापूरमध्ये सरपंच पदासाठी १७ जागा असून ४५ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी १४१ जागा असून ३00 उमेदवार आहेत. माणगावमध्ये सरपंच पदासाठी १७ जागा असून ४0 उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ८५ जागा असून १७३ उमेदवार आहेत. तळामध्ये सरपंच पदासाठी पाच जागा असून १२ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ११ जागा असून २३ उमेदवार आहेत. रोहामध्ये सरपंच पदासाठी सात जागा असून २१ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ५१ जागांसाठी ११७ उमेदवार आहेत.
सुधागडमध्ये सरपंच पदासाठी दहा जागा असून २३ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ७५ जागा असून १६४ उमेदवार आहेत. महाडमध्ये सरपंच पदासाठी १३ जागा असून ४0 उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ४९ जागांसाठी १0१ उमेदवार आहेत. पोलादपूरमध्ये सरपंच पदासाठी आठ जागा असून १७ उमेदवार आहेत. सदस्य पदासाठी ५३ जागा असून १0८ उमेदवार आहेत. श्रीवर्धनमध्ये सरपंच पदासाठी पाच जागा असून १२ उमेदवार आहेत.

उमेदवारांचा घरोघर भेटीचा कार्यक्रम
सदस्य पदासाठी १८ जागा असून ३७ उमेदवार आहेत. म्हसळामध्ये सरपंच पदासाठी दहा जागा असून २२ उमेदवार आहेत. तसेच सदस्य पदासाठी २७ जागांसाठी ५५ उमेदवार आहेत. १८७ पैकी ३९ सरपंचपद बिनविरोध झाले असून दोन सरपंचपद रिक्त राहिले आहेत. त्यामुळे सरपंचपदाच्या१४६ जागांसाठी निवडणूक होत असून ३९१ उमेदवार रिंगणात आहेत.
एक हजार ६४७ सदस्यपदांपैकी ७६ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. ५५३ जागा बिनविरोध तर ९९८ जागांवर निवडणूक होणार असून दोन हजार १९१ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. २७ मे रोजी जिल्ह्यातील ५२६ मतदान केंद्रांवर मतदान होईल. मतमोजणी सोमवारी होणार आहे.

Web Title: The election campaign stopped guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.