- जयंत धुळप अलिबाग - रायगड लाेकसभा मतदार संघांतर्गत महाड विधानसभा मतदार संघातील देशमुख कांबळे गावांतील 108 वर्षांच्या ज्येष्ठ मतदार सुलाेचनाबाई गाेविंद देशमुख यांनी देशमुख कांबळे मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावल्यावर महाड विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी भारत निवडणुक आयाेगाच्यावतीने आदरपूर्वक गाैरव केला.सुलाेचनाबाई व त्यांच्या कुटूंबातील मतदार सदस्यांना मतदान केंद्रावर आणुन परत घरी साेडण्याकरिती रायगड निवडणुक यंत्रणेकडून विशेष वाहन व्यवस्था केली हाेती अशी माहिती सुलाेचनाबाई यांचे नातू अॅड विनाेद देशमुख यांनी दिली आहे.सुलाेचना बाई यांना पुर्वीच्या कुलाबा लाेकसभा मतदार संघात झालेल्या 1952 मधील पहिल्या लाेकसभा निवडणुकीपासून आजवर 16 लाेकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. लाेकसभा ते ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकीत त्यांनी न चुकता मतदान करुन आगळा आदर्श सर्वांसमाेर ठेवला आहे. त्यांनी घालुन दिलेला आदर्श आम्ही पुठे चालू ठेवला असुन देशमुख कुटूंबातील सर्व मतदार मतदानाचा हक्क न चुकता बजावत असल्याचे अॅड देशमुख यांनी पूठे सांगीतले.रायगड लाेकसभा मतदार संघ निवडणुक निर्णय अधिकारी तथा रायगड जिल्हाधिकारी डाॅ विजय सुर्यवंशी यांनी सुलाेचनाबाई यांचे विशेष अभिनंदन केले. दरम्यान सुलाेचनाबाई यांच्या आजच्या मतदानाच्यावेळी देशमुख कांबळे ग्रामस्थांनी आदर व आैत्सूक्यापाेटी मतदान केंद्रा बाहेर माेठी गर्दी केली हाेती
108 वर्षांच्या मतदार सुलोचनाबाई गोविंद देशमुख यांचा निवडणूक आयाेगाने केला सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:32 PM