अलिबाग - 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे.
यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिराती याचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते यासह निवडणुकीची मतदान जागृती साठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या पक्षाचा सहभाग आहे आधी बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली. त्रिपाठी यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली.
निवडणूक निरीक्षक त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिली.तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते.