निवडणूक निरीक्षकांनी बैठकीत घेतला पूर्वतयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:19 PM2019-04-11T23:19:02+5:302019-04-11T23:19:07+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघ : अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना सूचना
अलिबाग : मावळ लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग यांनी गुरुवारी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांना माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ मतदारसंघात येतात. अशोक कुमार सिंग यांनी या विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि मतदारांना आपण भेटणार आहोत, असेही सांगितले.
मतदान साहित्य वेळेआधी व्यवस्थित पोहचतील या दृष्टीने नियोजन करावे, मनुष्यबळ पुरेसे व प्रशिक्षित आहेत किंवा नाहीत त्याची खात्री करून घ्यावी तसेच कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील असे पाहावे अशा सूचना त्यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने या वेळी उपस्थित होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी प्रास्ताविक केले.
दापोली येथील निवडणूक तयारीची निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी
च्अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांनी गुरुवारी दापोली तहसील कार्यालयास भेट देऊन तयारीचा आढावा घेतला, मतदार जनजागृतीसाठी सुरू असलेल्या उपक्र माची पाहणी केली.
च्याप्रसंगी त्यांनी ईव्हीएम यंत्र सील करणे तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी व मतदानानंतर मतदान यंत्रांची घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिकही पाहिले. मतदार जागृतीसंदर्भात उभारण्यात आलेल्या फलकावरही त्यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी त्यांनी मॉडेल मतदानकेंद्रासही भेट दिली.
च्निवडणूक प्रक्रि येतील आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्ष, मतदानकेंद्र, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्र म, मतदार व मतदान जागृती कार्यक्र म, वाहन व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची उपलब्धता, मतमोजणी केंद्र व प्रक्रि या यासंदर्भातील कामकाजाचा तसेच मतदानाची टक्केवारी याबाबतही त्यांनी आढावा घेतला.
च्आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, निवडणुकीसंदर्भात विविध कायदे व अधिनियम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, तसेच निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रि या पार पाडावी, असे निर्देशही या वेळी निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांनी दिले. या वेळी दापोली तहसीलदार समीर घारे उपस्थित होते.