निवडणूक चिन्हांमध्ये आता माउस, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह १९० चिन्हांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 12:21 AM2021-01-03T00:21:39+5:302021-01-03T00:21:49+5:30

Gram panchayat Election: आकर्षक चिन्हावर उमेदवारांचा डोळा : ४ जानेवारी रोजी होणार चिन्हांचे वाटप

Election symbols now include 190 symbols including mouse, pen drive, CCTV camera | निवडणूक चिन्हांमध्ये आता माउस, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह १९० चिन्हांचा समावेश

निवडणूक चिन्हांमध्ये आता माउस, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह १९० चिन्हांचा समावेश

Next

- आविष्कार देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : तालुक्यातील जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 
निवडणूक आयाेगाने ४० नव्या चिन्हांची भर घातली आहे. त्यामध्ये संगणकाचा माउस, पेनड्राइव्ह,सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बिस्कीट, भाजीपालांच्या चिन्हांचा समावेश असल्याने आकर्षक चिन्हावर उमेदवारांचा डाेळा राहणार आहे. जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेत आहेत. ८४० जागांसाठी सुमारे अडीज हजार अर्ज दाखल झाले आहेत. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवांराना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षाची भूमिका महत्त्वाची असली, तरी त्यांना त्यांची अधिकृत चिन्हे वापरता येत नाहीत. निवडणूक आयाेगाने नव्याने ४० चिन्हांचा समावेश केला आहे. त्यामुळे चिन्हांची संख्या १९० वर पाेहोचली आहे. त्यामुळे उमेदवारांना माेठ्या संख्येने चिन्ह देण्यात आली आहेत. त्यातील आकर्षक आणि मतदारांच्या लवकर पचनी पडतील, लक्षात राहतील, अशा चिन्हांवर उमेदवारांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे.

अशी आहेत चिन्हे
n टीव्ही, कपाट, रिक्षा, सफरचंद, एसी, टाेपली, बॅट, विजेरी (टॉर्च), मण्यांचा हार, पट्टा, दुर्बीण, फळा, हाेडी, पुस्तक, पेटी, पाव, ब्रश, बादली, बस, गणक यंत्र, कॅमेरा, कॅन, मेणबत्ती, खटारा, फॅन, साखळी, काेट, नारळाची बाग, नारळ, कंगवा, क्रेन, कपबशी, हिरा, ड्रील मशीन, डंबेल्स, विजेचे खांब, बासरी, फुटबाल, ऊस, गॅस सिलिंडर, आल, काचेचा पेला, चश्मा, द्राक्ष, हेडफाेन, हिटर, इस्त्री, फणस, जग, किटली, चावी, कडी, पत्रपेटी, लाईटर, ल्युडाे, जेवणाचा डबा, मका, काडेपेटी, माईक, मिक्सर, नगारा, टाय, कढई, वाटाणे, कंपासपेटी, पेन्सिल शार्पनर, उशीसह अन्य चिन्हांचा समावेश आहे.
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
एका ग्रापमपंचायतीसाठी संबंधित उमेदवाराला चिन्ह मिळाले, तर ते दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अन्य पॅनेलच्या उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना त्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी चिन्ह वापरावे लागणार आहे. म्हणजेच एकाच पॅनेलमधील उमेदवारांना विविध चिन्हावर लढावे लागणार आहे.

पेनड्राइव्ह, बिस्कीट, सीसटीव्ही, माउस या नवीन चिन्हांची पडली भर
n निवडणूक आयाेगाने नव्याने ४० चिन्हे देऊ केली आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हांची संख्या ही १९० वर पाेहोचली आहे. 
nत्यामध्ये प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरा, बिस्कीट, पेनड्राइव्ह, माउस, फलंदाज, टाेस्टर, सिमला मिरची, आक्राेड, भेंडी, टाेस्टर, कर्णफुले, चार्जर, बडे केक, फुगा, पांगुळगाडा, हवा भरण्याचा पंप, पोळपाट, लालटेन, आइसस्क्रीम, हिरवी मिरची, काटा,नरसाळे, हातगाडी, हार्माेनियम, हेलीकाॅप्टर, हेल्मेट, हाॅकी, वाळूचे घड्याळ, पाणी गरम करण्याचा हिटर,  यांसह अन्य चिन्हांचा समावेश आहे.

उमेदवार नवीन चिन्हांची मागणी करतात. त्यांनी मागणी केलेल्या चिन्हांची नाेंद करून निवडणूक आयाेग नवीन चिन्हांची वाढ करून देते. आता ४० नवीन चिन्हांची वाढ केली आहे. त्यामुळे तब्बल १९० निवडणूक चिन्ह झाली आहेत.
-सर्जेराव म्हस्के-पाटील  उप जिल्हाधिकारी, रायगड

Web Title: Election symbols now include 190 symbols including mouse, pen drive, CCTV camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.