अलिबाग : जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम पारदर्शक, नियोजनबद्ध आणि नि:पक्षपातीपणे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी येथे दिले.अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात विधानसभा निवडणूक २०१९ बाबत प्रशिक्षण कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. निवडणुकीसंदर्भातील सर्व समिती प्रमुख, सदस्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करु न देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्व समिती प्रमुखांनी आपल्या सदस्यांकडून चांगले काम करु न घ्यावे. निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांनी निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच उल्लघंन करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक प्रचार काळात सर्व समित्यांनी आपआपल्या दिलेल्या सर्व जबाबदाºया व्यवस्थित व प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. व्हिडीओ पाहणी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक यांनी आपली जबाबदारी पार पाडताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हीजल हे मोबाइल अॅप विकसित केले आहे त्याचा योग्य तो वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. आजच्या प्रशिक्षण कार्यक्र मात एक खिडकी योजना, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, लेखांकन टीम, बँक खाते, लेख्यातील त्रुटी, खर्च निरीक्षक व त्यांचे अहवाल, सहायक खर्च निरीक्षकांची कामे त्यांच्या भूमिका, सीव्हीजल, प्रसार माध्यमे प्रमाणीकरण व आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आदी समित्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, विविध समिती प्रमुख, सदस्य उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांनी घेतला उरण मतदारसंघाचा आढावाअलिबाग : उरण विधानसभा मतदारसंघातील रायगड जिल्हा परिषद शाळा जासई येथे आचारसंहिता पथक, खर्च नियंत्रण समिती, अन्य समित्यांचे नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयक तयारी व कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी आढावा घेतला.विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने निवडणूकविषयक सर्व कामकाजाची तयारी झाली आहे. त्या अनुषंगाने उरण विधानसभा मतदार संघात ३२७ मतदान केंद्रे आहेत. या मतदार संघात एकूण दोन लाख ९२ हजार ९५१ इतके मतदार आहेत. त्यामध्ये पुरु ष मतदारांची संख्या एक लाख ४७ हजार १९८ तर, स्त्री मतदारांची संख्या एक लाख ४५ हजार ६५० तसेच अन्य तीन मतदार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच दि.बा.पाटील मंगल कार्यालय जासई येथे क्षेत्रीय अधिकारी यांनाही जिल्हाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीचे काम करताना एक चूक देखील केलेल्या चांगल्या कामाचे नुकसान करु शकते. त्यामुळे निवडणुकीचे काम करताना आपणावर कोणी काम लादलेले आहे असे न समजता आनंदाने केले तर ते काम योग्यरीतीने बिनचूक पूर्ण करता येते. क्षेत्रीय अधिकाºयांनी वयोवृध्द मतदार व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात येणाºया सुविधांविषयी माहिती देऊन त्यांचे जास्तीत जास्त मतदान होईल ते पहावे. मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी उरण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील, नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.शासकीय यंत्रणा सज्जलोकसभा निवडणुकीनंतर आत्ता विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले आहे.उरण विधानभा मतदारसंघात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कामाचा आढावा घेतला.
निवडणुकीचे काम पारदर्शक, नि:पक्षपाती करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:13 PM