कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींच्या ३१ आॅगस्टला निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:38 AM2019-08-01T01:38:44+5:302019-08-01T01:39:01+5:30
१ आॅगस्ट रोजी त्या पाच ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, १३ डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपत असलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई या पाच ग्रामपंचायतींच्या मुदत या वर्षअखेरीस संपत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १३ डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
१ आॅगस्ट रोजी त्या पाच ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे.
त्यानुसार ९ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट या दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे, तर १९ आॅगस्ट रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, २१ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वैध ठरलेले नामांकन अर्ज मागे घेता येणार आहेत. ३१ आॅगस्ट रोजी मतदान घेतले जाणार असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीमध्ये मतदान घेतले जाईल. तर मतमोजणी ३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
आरक्षित असलेल्या जागा
च् ३१ आॅगस्ट रोजी निवडणूक होत असलेल्या १७ सदस्यीय नेरळ ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचपदाकरिता अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आहे, तर उमरोली या १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिला राखीव आहे.
च्वाकस या ११ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी नागरिकांचे मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. त्याच वेळी वरई या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद सर्वसाधारण असून, तिवरे या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीचे थेट सरपंच अनुसूचित जमाती महिला राखीव आहे.