अलिबाग : राज्य निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील ४० सार्वत्रिक आणि ८१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २८ आॅक्टोबर २०१५ ला निवडणुका पार पडणार आहेत. जिल्ह्यात त्यामुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.उरण आणि पेण तालुक्यातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याचप्रमाणे रोहा- १८, श्रीवर्धन आणि कर्जत- प्रत्येकी चार आणि म्हसळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज, सुधागड, श्रीवर्धन, कर्जत या ठिकाणी प्रत्येकी एकाच जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. पेण- नऊ, पनवेल, रोहे, मुरुड - प्रत्येकी दोन, माणगाव- पाच, महाड-३३, म्हसळा, तळा- प्रत्येकी तीन, पोलादपूर-१३, खालापूर- चार अशा ८१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडणार आहेत. (प्रतिनिधी)-----------निवडणुकीचा कार्यक्रमग्रामपंचायचींच्या निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे २८ सप्टेंबर २०१५नामनिर्देक्षण पत्रे मागविणे व सादर करणे ७ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर २०१५ वेळ- सकाळी - ११ ते दुपारी -४ सुटीच्या दिवशी बंदअर्जाची छाननी करणे-१४ आॅक्टोबर २०१५ सकाळी ११ वाजल्यापासूनअर्ज मागे घेणे- १६ आॅक्टोबर २०१५ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतचिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे १६ आॅक्टोबर २०१५ दुपारी ३ वाजल्यानंतरमतदानाचा दिनांक २८ आॅक्टोबर २०१५सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंतमतमोजणी दिनांक २९ आॅक्टोबर २०१५ निवडणुकांचा निकाल प्रसिध्द करणे ३० आॅक्टोबर २०१५उरण आणि पेण तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका
जिल्ह्यात पोटनिवडणुका जाहीर
By admin | Published: September 29, 2015 1:27 AM