निखिल म्हात्रे, अलिबाग - गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजले आहे. रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 99 सदस्यपदाच्या; तर 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
यामध्ये अलिबाग तालुक्यातील 15, मुरुड 15, पेण 11, पनवेल 17, उरण 3, कर्जत 7, खालापूर 22, रोहा 12, सुधागड 13, माणगाव 26, तळा 6, महाड 21, पोलापुर 22, श्रीवर्धन 8 आणि म्हसळा 12 असा समावेश आहे.
नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे.