आगरदांडा/ मुरुड : मुरु ड तालुक्यात पाच गावांमध्ये प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका थेट सरपंच निवडीमुळे चुरशीच्या होणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ग्रामीण भागामध्ये सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणुकांकडे लक्ष देत आहेत. नेते आपला पाया मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी या निवडणुकीमध्ये सहभाग घेत आहेत. तालुक्यात पाच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या वेळी संपूर्ण गावाने मतदान करून, थेट सरपंच निवडला जाणार आहे.पक्षापेक्षा गटा-तटाचे आणि भाऊबंदकीचे राजकारण ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उफाळून येत आसल्यामुळे लोकशाहीतील ग्रामपंचायत शेवटचा स्तर समजला जातो. गावागावांमध्ये चुरशीने ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या जात असल्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे. यामुळे पुढील एक महिन्यात तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. थेट सरपंच निवडला जाणार आहे, यामुळे नेते मंडळींना आपल्या मर्जीतील उमेदवार लाटून निवडणुका जिंकता येणार नाहीत. शासन योजना जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंत कामासाठी धडपड करणारा, जनमाणसांत प्रतिमा असणारा उमेदवारच सरपंचपदासाठी गावपातळीवर यशस्वी होणार असल्यामुळे घराणेशाही, पैशांचा वापर करणाºया उमेदवारांना या निवडणुकीत थारा मिळणार नसल्याने नेते आणि गावपातळीवरील काही पुढारी धास्तावले आहेत. तालुक्यात पाच गावांतील ग्रामपंचायत निवडणुका होत असल्यामुळे शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपासह अपक्ष पक्ष, अशा सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते गावपातळीवर भाऊबंदकीच्या पाठिंब्यावर आघाडीचे राजकारण करीत आहेत.पोलादपूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकापोलादपूर : तालुक्यातील एकूण १६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रि येची तयारी पोलादपूर तहसील कार्यालयाद्वारे सुरू झाली आहे. येत्या १४ आॅॅक्टोबरला निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी जाधव यांनी येथे दिली.पैठण, गोळेगणी, ओंबळी, कोतवाल बु.,कोतवाल खुर्द, बोरघर, उमरठ, कापडे खुर्द, चांभारगणी, पार्ले, दिविल, लोहारे, भोगाव, कालवली, धामणदेवी, परसुले आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.पैठण ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जमाती, कोतवाल खुर्द, उमरठ, कापडे खुर्द, धामणदेवी, भोगाव खुर्द, ओंबळी, गोळेगणी, कालवली कोतवाल बु. ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे, तर बोरघर, लोहारे, चांभारगणी ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखीव आहे, तसेच दिविल, पार्ले ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. तसेच परसुले ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. कुडपन ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी २०१८ मध्ये संपत असल्याने सदर ग्रामपंचायतीची निवडणूक नंतर घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार जाधव यांनी सांगितले.उरणमधील १८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर उरण : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १४ आॅक्टोबर रोजी होणार असून सर्वच राजकीय पक्षाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, १८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. नवीन शेवा - सर्वसाधारण, बोकडवीरा - सर्वसाधारण (महिला), भेंडखळ - अनु. जमाती, डोंगरी - सर्वसाधारण, पाणजे - सर्वसाधारण (महिला), नवघर - अनु. जाती, पागोटे - ना. मा. प्र., घारापुरी - सर्वसाधारण, जसखार - ना. मा. प्र., करळ - सर्वसाधारण, धुतुम - सर्वसाधारण (महिला), चिर्ले - सर्वसाधारण (महिला), रानसई - ना. मा. प्र. (महिला), कळंबसुरे - सर्वसाधारण (महिला), पिरकोन - सर्वसाधारण, वशेणी - ना. मा. प्र., सारडे - ना. मा. प्र. आणि पुनाडे - सर्वसाधारण (महिला). निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येतील.रोहा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची निवडणूक रोहा : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या कालखंडाची मुदत येत्या आॅक्टोबरमध्ये संपत असून, या ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १४ आॅक्टोबर रोजी होत असून, या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.रोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी, पुई, पहूर, चणेरा, खैरे खुर्द, खांबेरे, दापोली अशा सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी बलाढ्य कार्यकर्त्यांची सरपंचपदासह सदस्य उमेदवारांची जुळवाजुळव प्रक्रि या सुरू आहे. तसेच तालुक्यातील नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये तालुक्यातील सर्वच पक्ष निवडणुकीसाठी अग्रेसर असल्याचे संकेत मिळत आहेत.तालुक्यातील राष्ट्रवादी दोन गट शेकाप युतीत सामील होतील की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तर शिवसेना व भाजपा ‘एकला चलो रे भाई’ या भूमिकेवर ठामआहेत.होणाºया या सात ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच जनतेचा आणि सरपंच आपला निवडून यावा, यासाठी येथील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते कंबर कसून तयारी करत आहेत.
राजगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, सर्वच पक्ष सज्ज: मुरुड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 6:46 AM