पनवेल तालुक्यात 17 ग्रामपंचायतीत निवडणूक
By वैभव गायकर | Published: October 3, 2023 09:01 PM2023-10-03T21:01:15+5:302023-10-03T21:01:38+5:30
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: पनवेल तालुक्यातील मुदत संपलेल्या 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजले आहे. रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 99 सदस्यपदाच्या; तर 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
यामध्ये पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच समावेश आहे.निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.23 रोजी होईल.नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे.