दोन नगरपरिषद, १७ नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:15 AM2020-12-02T01:15:53+5:302020-12-02T01:16:08+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी, २०२१ ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा व १७ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा तर १७ नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर होताच, रायकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी, २०२१ ते फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २ नगरपरिषदा व १७ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
त्यानुषंगाने जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतीची मुदत २४ जानेवारी, २०२१ रोजी संपली आहे. प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना २ डिसेंबर, २०२० रोजी संबंधित नगरपंचायतीच्या व जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व वेबसाइट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.
हरकती व सूचना स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांची पुढीलप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे.
खालापूर नगरपंचायत
अधिकाऱ्याचे नाव -
गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद,
तारीख : बुधवार २ ते बुधवार ९ डिसेंबर, २०२०
वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
ठिकाण : खालापूर नगरपंचायत
माणगाव
अधिकाऱ्याचे नाव -
गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद,
तारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०
वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
ठिकाण : माणगाव नगरपंचायत
पोलादपूर
अधिकाऱ्याचे नाव -
विराज लबडे, मुख्याधिकारी, पोलादपूर नगरपंचायत
तारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०
वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
ठिकाण : पोलादपूर नगरपंचायत
म्हसळा
अधिकाऱ्याचे नाव -
मनोज उकिर्डे, मुख्याधिकारी, म्हसळा नगरपंचायत
तारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०
वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
ठिकाण : म्हसळा नगरपंचायत
तळा
अधिकाऱ्याचे नाव -
माधुरी मडके, मुख्याधिकारी, तळा नगरपंचायत
तारीख : बुधवार २ ते बुधवार, ९ डिसेंबर, २०२०
वेळ : सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
ठिकाण : तळा नगरपंचायत