शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आदिवासींचा वन कायद्यातील सुधारणेविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:32 PM

जिल्हा प्रशासनाला निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग : वन कायद्यातील सुधारणा रद्द करण्यासोबत, वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी यासाठी शोषित जनआंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.वनहक्क कायदा २००६ चा प्रभाव व अंमल भारतीय वन अधिनियमापेक्षा अधिक मानला जायला हवा. तसेच केंद्र सरकारने ७ मार्च २0१९ रोजी भारतीय वन कायदा १९२७ मध्ये आदिवासी व जनविरोधी अनेक सुधारणा सुचविल्या आहेत. केंद्र सरकार आणत असलेल्या नवीन भारतीय वन कायद्यामुळे आदिवासी आणि परंपरागत वननिवासींवर अन्याय होणार आहे. वन क्षेत्रावर वनखात्याची राजवट पुन्हा प्रस्थापित करून खाजगी कंपन्यांना रान मोकळे करायचे असा या कायद्याचा हेतू असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. वन गुन्हे रोखण्यासाठी वनविभागाला बंदुकी देण्याचा, स्वतंत्र जेल निर्माण करण्याचा, गोळीबार करण्याचा आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंड घेण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. शिवाय वन गुन्ह्यांचा शोध घेणे, पुरावे जमा करणे, न्याय निवाडा करण्याचे सर्व अधिकार वन अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

वनहक्क कायद्याने मिळालेले वनहक्क धारकांचे हक्क कमी करण्याचे किंवा जबरदस्तीने काढून घेण्याचे, कोणतेही क्षेत्र वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचे अधिकार वनअधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. हे सर्व निर्णय आदिवासी बांधवांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मोर्चाला शेतकरी भवनपासून सुरुवात झाली आणि मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हिराकोट तलावाजवळ पोलिसांनी अडवले. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

प्रांत कार्यालयावर आदिवासींची धडक१कर्जत : राज्यात व देशभरातील विविध जनसंघटनांनी सतत केलेल्या लढाया, आंदोलने यामुळे मंजूर झालेल्या वनहक्क कायद्याला वाचवण्यासाठी व केंद्र सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. कर्जत - खालापूर तालुक्यातील हजारो आदिवासी व जंगलवासी या मोर्चात सहभागी झाले होते.२कर्जत आमराई मैदानातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व नॅन्सी गायकवाड, अध्यक्ष केशव वाघमारे, उपाध्यक्षा सुशीला भोई, सचिव अनिल सोनावणे, ताई आगिवले, नामदेव निरगुडा, लक्ष्मण पवार यांनी केले. मोर्चा बाजारपेठेतून फिरून प्रांत कार्यालयावर पोहचला. पिढ्यान पिढ्या आदिवासी व जंगलवासीयांवर झालेल्या अन्यायाचे प्रायचित्त म्हणून केंद्र सरकारने २००६ साली वनहक्क कायदा लागू केला या कायद्यामुळे काही भागात आदिवासींना फायदा झाला, परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक भागात हा कायदा लागूच केला गेला नाही.

३कर्जत खालापूर तालुक्यासह जिल्हाभरात अनेक आदिवासींचे वनहक्काचे दावे फेटाळले गेले आहेत जे आदिवासी जंगल जमीन कसतात पण त्याचा ग्रामपंचायत पातळीवर गहाळ केला गेला आहे अशा वहिवाटधारकांना जंगलातून हुसकावले जात आहे असे असताना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी या कायद्याच्या हेतूलाच छेद देणारा घटना विरोधी, लोकशाही विरोधी धोरण सध्याचे केंद्र व राज्य सरकार घेत आहे. या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने कर्जतच्या उपविभागीय महसूल कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्यावतीने प्रांत वैशाली परदेशी यांना निवेदन देण्यात आले.