आदिवासी तरुणाला रोजगार; पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन

By वैभव गायकर | Published: May 26, 2024 01:31 PM2024-05-26T13:31:34+5:302024-05-26T13:32:06+5:30

कर्नाळा अभयारण्य परिसरात येणाऱ्या पक्षीप्रेमींना पक्षांचा अधिवास असलेल्या ठिकाणी नेऊन त्यांना या पक्षाचे दर्शन घडवत आहे.

employment of tribal youth guidance for tourists coming for bird watching | आदिवासी तरुणाला रोजगार; पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन

आदिवासी तरुणाला रोजगार; पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल:आजच्या काळात पक्षीनिरीक्षण हा पर्यटनाचा एक वेगळा पर्याय प्रचलित होत आहे.दऱ्या खोऱ्या मध्ये जाऊन पक्षीप्रेमी अथवा पक्षी निरीक्षक दुर्मिळ पक्षाचे छायाचित्र आपल्या कॅमे-यात टिपत असतात.कर्नाळा अभयारण्य परिसरात कोरल वाडी या आदिवासी वाडीत राहणाऱ्या तरुणाने पक्षी निरीक्षणाची गरज ओळखून स्वतःसाठी व आपल्या कुटुंबियांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात येणाऱ्या पक्षीप्रेमींना पक्षांचा अधिवास असलेल्या ठिकाणी नेऊन त्यांना या पक्षाचे दर्शन घडवत आहे.

रमेश दशरथ वाघे (26)असे या तरुणाचे नाव आहे.बारावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या रमेशने पक्षी निरीक्षणालाच आपला व्यवसाय केला असून पक्षी प्रेमींना कर्नाळाच्या दऱ्या खोऱ्यात दुर्मिळ पक्षांचे दर्शन घडविण्याचे पूर्णवेळ काम रमेश करतो.याकरिता मुंबई उपनगर,महाराष्ट्रात तसेच देशभरातील कानाकोपऱ्यातील पर्यटक कर्नाळा मध्ये येतात.सोशल मीडियावर तयार केलेल्या आपल्या अकाउंटद्वारे रमेशचे आणि पर्यटकांचे संवाद होत असते.यापूर्वी रमेश स्वतः कर्नाळा अभयारण्यात गाईडचे काम करायचा.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनायाचे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षक रमेश वाघेणे घेतले आहे.पक्षी निरीक्षणासाठी रमेशने कृत्रिम पाणवठे तसेच हाईड देखील उभारल्या आहेत.हाईड म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी लपुन बसण्याची एक जागा असते.आदिवासी समाज नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे.अशा आदिवासी समाजाला रमेश वाघेणे एक आदर्श निर्माण केले आहे.डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करून रमेश पर्यटकांशी संवाद साधतो.

कर्नाळयाला परिसरात एका वर्षात सुमारे 125 -150 जातीचे पक्षी आढळतात. सुमारे 12 चौरस कि.मी. परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे.कोरल वाडी हि या परिसराचा एक भाग आहे.

पक्षी निरीक्षणात आढळणारे पक्षी -

मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे,निळा फ्लायकँचर,लाल छाती फ्लायकँचर,तैगा, काळी डुलकी,भारतीय स्वर्ग, गोल्डन फ्रंटेड,निळा कॅप्ड रॉक,पांढरा-रम्पड,रीड वॉरबलर,थिक नी,जंगल ऑवलेट,ऑरेंज हेडेड थ्रश यांसह असंख्यस्थानिक आणि विदेशी प्रजातीच्या स्थलांतरित पक्षाच्या प्रजाती या निरीक्षणादरम्यान आढळतात.

कर्नाळा अभयारण्यात गाईड म्हणून कार्यरत असताना याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडूनच मला स्वतंत्र्यपणे पक्षिनिरीक्षण करण्याची सुचना केल्या गेल्या.याबाबत मी सोशल मीडिया तसेच शासनाच्या पर्यटन विभागाकडून प्रशिक्षण घेऊन आज मी स्वतः पर्यटकांना पक्षांची माहिती देण्याचे काम करतो.याकरिता कृत्रिम पाणवठे व हाईड देखील मी तयार केले आहेत.पर्यटकांनी संपर्क साधण्यासाठी  मी karnala_bird_guide हा इन्स्टा आयडी तयार केला आहे. - रमेश दशरथ वाघे (पक्षी निरीक्षक ,गाईड )

Web Title: employment of tribal youth guidance for tourists coming for bird watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल