जयंत धुळपरायगड - सन २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरु ग्णाचे उपचाराकरीता सनियंत्रण करु न उपचार पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षयरु ग्णांवर उपचार करावे, शासकीय, खाजगी वैद्यकीय यंत्रणा,औषध विक्र ेते यांच्याशी समन्वय राखावा व प्रत्येक रु ग्णांवर पुर्ण उपचार होईल याकडे लक्ष द्यावे असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. रायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रणासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई,जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.एस.के.देवकर,जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.अमति कराड, आयएमए अलिबागचे डॉ. सुधाकर बडिगरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त डॉ.गिरीष हुकरे, पनवेल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्मीनी येवले आदी मान्यवर उपस्थित होते.सरकारी ३ हजार ५४४ तर खाजगी रुग्णालयात १ हजार ०७९ क्षयरु ग्णजिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.एस.के.देवकर यांनी बैठकीत सविस्तर माहिती दिली. देशातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंतचे उदीष्ट ठरविले आहे. जिल्ह्यात सन २०१७ अखेर ३ हजार ५४४ क्षयरु ग्ण शासकीय वैद्यकीय यंत्रणेकडे खाजगी वैद्यकीय सेवांकडे १ हजार ०७९ असे जिल्ह्यात ४ हजार ६२३ क्षयरु ग्ण असल्याचे डॉ.देवकर यांनी सांगीतले.खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्र ेत्यांचे सहकार्य आवश्यकजिल्ह्यात उपचार घेणाºया सर्व रु ग्णांची माहिती व रु ग्ण पूर्ण बरा होईपर्यंतचा पाठपुरावा याबाबत माहिती उपलब्ध होण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्र ेत्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेस सहकार्य करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाकडून यापूर्वीच परिपत्रक निर्गिमत करण्यात आले आहे.तथापि, या सर्व खाजगी व शासकीय वैद्यकीय यंत्रणांचा परस्पर समन्वय आवश्यक आहे.उपचार पुर्ण करु न क्षयरोग निर्मुलननिदान झालेल्या क्षयरु ग्णावर उपचार पूर्ण होणे आवश्यक आहे. अर्धवट उपचार केल्यास रु ग्ण हा दाद न देणाºया क्षयरोग जंतुंचा वाहक(एमडीआर) बनतो. व नंतर त्यास उच्च पातळीचे उपचार करावे लागतात. त्यासाठी खाजगी डॉक्टर्स, क्षयरोग निदानाच्या चाचण्या करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध विक्र ेते यांच्याशी शासकीय यंत्रणा परस्परांशी समन्वय राखतील. उपचार पुर्ण करणारे रु ग्ण, डॉक्टर्स,औषध विक्र ेते यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे अशा प्रकारच्या उपयायोजना राबवून उपचार पुर्ण करु न क्षयरोग निर्मुलनाचे उदिष्ट पुर्ण करावयाचे आहे. यासाठी सर्व संबंधितांची समन्वय ठेवावा असे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले.----------------------------------------
२०२५ अखेर क्षयरोग निर्मुलन उद्दीष्ट, २०१७ अखेर जिल्ह्यात ४ हजार ६२३ क्षयरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 6:23 PM