शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
5
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
6
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
7
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
8
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
9
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
10
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
11
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
12
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
13
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
14
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
15
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
16
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
17
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
18
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
20
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग

खोरा बंदरातील जेट्टीच्या विकासकामांमध्ये त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:36 AM

ब्रिटिश राजवटीपासून बोटीने वाहतूक होणारे एकमेव ठिकाण म्हणजे खोरा बंदर. सध्या विविध माध्यमातून खोरा बंदराचा विकास होत आहे, परंतु ही विकासकामे होत असताना

संजय करडे मुरुड जंजिरा : ब्रिटिश राजवटीपासून बोटीने वाहतूक होणारे एकमेव ठिकाण म्हणजे खोरा बंदर. सध्या विविध माध्यमातून खोरा बंदराचा विकास होत आहे, परंतु ही विकासकामे होत असताना कोणताही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने कामात त्रुटी रहात आहेत.खोरा बंदरातून मशिन बोटीद्वारे जंजिरा किल्ल्यापर्यंत वाहतूक केली जाते, परंतु ही बोट ओहोटीच्या वेळी खाली जाते. नव्याने बांधण्यात आलेली जेट्टी उंच राहिल्याने बाजूला दुसरी बोट ठेवावी लागत असून तिच्या टपावर वरून खाली उतरावे लागते. त्यामुळे असंख्य पर्यटकांची गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खोरा बंदरातील जेट्टीची उंची वाढवली असली तरी पाण्यात जाणारा भाग दूरवर वाढवणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ओहोटीच्या समयी फक्त पाच वाजेपर्यंत वाहतूक होते. त्यानंतर बोट किनाºयावर लावण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. बोटी किनारी लागल्या तरी प्रवाशांना चढ-उतार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अशावेळी पडून प्रवाशाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खोरा बंदराच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन खर्चही झाला. मात्र संबंधित अधिकाºयाचे दुर्लक्ष आणि योग्य नियोजनाअभावी जेट्टीची बांधणी चुकीची झाली आहे.ओहोटीच्या समयी नवीन बांधण्यात आलेल्या जेट्टी काहीच उपयोगात येत नाही.त्यामुळे भरतीच्या पाण्याची वाट पाहावी लागते.करोडो रु पयांचा यासाठी विकासनिधी खर्च झाला, परंतु संबंधित अधिकारी कामाच्या वेळी उपस्थित न राहिल्याने कामात त्रुटी राहिलेल्या आहेत. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून नेमलेल्या ठेकेदाराकडून चांगले काम करून घ्यावे, अशी मागणी असंख्य पर्यटकांनी केली आहे.