- आविष्कार देसाईरायगड - सरकारी नाेकरीकडे डाेळे लावून बसलेल्या अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा यादीवरील तब्बल ५० उमेदवारांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.किरण पाटील यांनी या नियुक्त्यांच्या फायलीवर स्वाक्षऱ्या करून ऐन दिवाळीच्या ताेंडावर उमेदवारांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना अतिशय कष्टमय जीवन जगावे लागले आहे. कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षणही पूर्ण केले आहे. मात्र, त्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील फायली वर्षानुवर्षे गठ्ठ्यात दबल्या गेल्या हाेत्या. त्या आता बाहेर काढून मृतांच्या वारसांना न्याय देण्याचे काम डाॅ.पाटील यांनी केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषदेकडे एकूण ७९ अर्ज आले हाेते. पैकी ५० उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आराेग्यसेवक पुरुष-११, ग्रामसेवक-१०, परिचर-९, शिक्षक-५, पर्यवेक्षिका-३, स्त्री परिचर-३, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-२, वरिष्ठ सहायक लिपिक-२, कनिष्ठ अभियंता बांधकाम-२, कनिष्ठ सहायक लेखा-२, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा)-१, औषध निर्माण अधिकारी-१ यांचा समावेश आहे. वेळाेवेळी निर्गमित झालेल्या सरकारी निर्णयाच्या अधिन राहून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.सरकारच्या याेजना सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम आहे. दीर्घ कालावधीपासून अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचा प्रश्न प्रलंबित हाेता. मृतांच्या वारसांना वेळेवर त्यांचा हक्क मिळणे गरजेचे हाेते. यासाठी निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पाठबळ मिळाले.- डाॅ. किरण पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला हाेता, त्यांच्या वारसांना शिक्षण पूर्र्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळतेच असे नाही. कोरोना परिस्थितीत तर अनेकांचे हाल झाले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील वारसांना आता नोकरी मिळणारआहे.