तब्बल ७२ वर्षे होऊनही वारसनोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:57 AM2017-11-07T02:57:59+5:302017-11-07T02:58:02+5:30
‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील
मुरुड जंजिरा : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील शेतक-याच्या बाबतीत घडला आहे. याबाबत आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी शेतकºयाच्या प्रलंबित प्रश्नी मंडळ अधिकारी यांची भेट घेऊन वारस नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नांदगाव येथील सर्व्हे क्र. २४,गट क्र. ३९३ या मिळकतीचे मूळ मालक रामा नागू पाटील ऊर्फ माळी यांच्या वारसाची नोंद नसल्याने आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या वतीने कोकण आयुक्त कोकणभवन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी, मुरु ड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
कोकण आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून वंचित असलेल्या शेतकºयाची वारस नोंदी करण्याबाबत कळविण्यात आले होते.
कोकण आयुक्तांनी मंडळ अधिकारी यांना सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. यालाही जवळपास एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्याप वारस नोंद झालेली नाही.
आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी अध्यक्ष राजाराम पाटील व शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी नुकतीच मंडळ अधिकारी नारायण गोयजी यांची भेट घेतली. मयत शेतकºयाच्या वारसनोंद कामी पंचनामा, जबाब घेण्यात आला. यावेळी दत्ता माळी, रामा माळी, काशिनाथ माळी, सागर माळी, राजा माळी व गावपंच कमिटी सदस्य उपस्थित होते.