मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक
By वैभव गायकर | Published: August 26, 2024 11:35 AM2024-08-26T11:35:04+5:302024-08-26T11:35:16+5:30
पनवेल महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरण सोमवार सकाळपासूनच कामाला लागली.
पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार दि. 26 रोजी पनवेल पळस्पे फाटा याठिकाणी येणार आहेत. तत्पूर्वीच प्रशासन कामाला लागल्याचे पहावयास मिळाले. यावेळी सायन-पनवेल महामार्ग चकाचक करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरण सोमवार सकाळपासूनच कामाला लागली. विशेष म्हणजे पळस्पे सर्कल जवळ गेले कित्येक वर्ष साचणारे पाणी थेट सक्शन मशीन लावून हा पाणी काढून टाकण्यात आले.सकाळ पासून शेकडो कामगार याठिकाणी कार्यरत आहेत.
पळस्पे जेएनपीटी मार्गावरील भले मोठे खड्डे देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मेहनत घेताना दिसून आले.संपूर्ण पावसाळ्यात रस्त्याची पूर्ण चालण झालेली पहावयास मिळाली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने पनवेलमध्ये मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले.