शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

अखेर धोत्रेवाडी विहीर आदिवासींसाठी खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:17 AM

मागील वर्षी सदर विहीर असलेली जमीन वासुदेव पाटील यांनी खरेदी केली आणि नंतर संपूर्ण जागेला कुंपण घातले.

कर्जत : तालुक्यातील धोत्रेवाडी येथील पाण्याच्या विहिरीला तारेचे कुंपण घालून पाणी देण्यात हरकत घेतली होती.त्याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेत धोत्रेवाडी विहिरीला घातलेले कुंपण खुले करण्याचे आदेश दिले.धोत्रेवाडी या टेंबरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गावात असलेली पाण्याची विहीर खासगी जागेत पूर्वी बांधली होती. मागील वर्षी सदर विहीर असलेली जमीन वासुदेव पाटील यांनी खरेदी केली आणि नंतर संपूर्ण जागेला कुंपण घातले. त्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण होताच धोत्रेवाडीमधील महिला त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असता पाटील यांनी विहिरीवर येण्यास बंदी घालून शिवीगाळ केली होती. त्यामुळे आदिवासी संघटनेने कर्जत तहसीलदार यांना १७ मे रोजी पत्र पाठवून विहीर खुली न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता.जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी तत्काळ विहीर अधिग्रहण करून खुली करण्याचे आदेश कर्जत तहसील कार्यालयाला दिले. तहसीलदार अविनाश कोष्टी, मंडळ अधिकारी पी. पी. नवाळे यांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासह धोत्रेवाडी येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करून विहीर आदिवासींसाठी खुली केली.

टॅग्स :Waterपाणी