अंधश्रद्धेतून सर्वांनी बाहेर पडले पाहिजे
By Admin | Published: August 12, 2015 11:37 PM2015-08-12T23:37:58+5:302015-08-12T23:37:58+5:30
वाचन संस्कृती फार महत्त्वाची आहे. बोलीभाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. पण आपल्या भाषेचा अभिमान असणे गरजेचे. जाती, धर्म, लिंगभेद करणे चुकीचे आहे.
अलिबाग : वाचन संस्कृती फार महत्त्वाची आहे. बोलीभाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. पण आपल्या भाषेचा अभिमान असणे गरजेचे. जाती, धर्म, लिंगभेद करणे चुकीचे आहे. जात नाही ती जात. या अंधश्रद्धेतून, रूढी, परंपरांतून आपण सर्वांनी बाहेर पडले पाहिजे आणि हा बदल फक्त तरु ण पिढी करू शकते, असा विश्वास वसुधा पाटील ऊर्फ मराठीतील कवयित्री व कथालेखिका नीरजा यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी पीएनपी महाविद्यालयाच्या १३ व्या वर्धापनदिनी पीएनपी संकुलात आयोजित कार्यक्र मात नीरजा प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री शिक्षणाची दारे उघडली आहेत, स्त्री सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. बहुतेक स्त्रीविषयी सदर जास्तीत जास्त त्यांच्याकडून लिहिले गेले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. मी शहाबाज येथील साहित्यिक व समीक्षक म. सु. पाटील यांची कन्या. आजवर अनेक ठिकाणी कार्यक्र मासाठी आमंत्रित केले गेले. पण आपल्या मातीतला हा माझा सत्कार मी कधीही विसरणार नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
उपप्राचार्य संजीवनी नाईक म्हणाल्या, शिक्षण फक्त डिग्रीसाठी नको. शिक्षणाचा उपयोग दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचा आहे. पीएनपी महाविद्यालय २००३ मध्ये ५३ विद्यार्थ्यांपासून सुरू झाले. आता महाविद्यालयात दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही एक तपाची साधना आहे. यामध्ये संस्थाचालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, प्रा. डॉ. ओमकार पोटे, प्रा. डॉ. प्रगती पाटील, प्रा. सानिका बाम, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. विक्र ांत वार्डे आदी उपस्थित होते.
(विशेष प्रतिनिधी)