कर्जतमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:53 AM2019-01-01T00:53:17+5:302019-01-01T00:53:58+5:30

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये व्होट व्हेरिफाइड पेपर एडिटर ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे या बाबतच्या जनजागृतीसाठी कर्जत प्रांत कार्यालयाच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 E.V.M., VVPAT Public awareness in Karjat | कर्जतमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती

कर्जतमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती

Next

कर्जत : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये व्होट व्हेरिफाइड पेपर एडिटर ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे या बाबतच्या जनजागृतीसाठी कर्जत प्रांत कार्यालयाच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात, निवासी नायब तहसीलदार संजय भालेराव, लिपिक अविनाश गुर्लेसह भाजपाचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, राजाभाऊ कोठारी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इरफान अत्तार, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, दिनेश रावळ, कृष्णा जाधव, जया म्हसे आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी परदेशी यांनी ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे विश्वासाबरोबर खात्री. व्हीव्हीपॅटमध्ये प्रिंटर प्रमाणे जोडलेले आहे. मतदाराने ईव्हीएमवर बटण दाबल्यानंतर एक चिठ्ठी बाहेर पडते, त्यावर मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, क्र म आणि निवडणूक चिन्ह दिसते. या पद्धतीने अवलंब आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच केला जाणार आहे. निवडणुकीत पारदर्शकता आणण्याकरिता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. व्हीव्हीपॅट मतदान प्रणालीमुळे कोणाला मतदान केले आहे हे मतदाराला समजू शकणार आहे. मतदाराला त्याचे मत आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच पडले आहे याची खात्री करून घेता येणार आहे, असे सांगितले.
कर्जत तालुक्यात २०६ मतदान केंद्र असून, पूर्ण मतदार संघात ३२६ मतदान केंद्र येत असून, या सर्व मतदान केंद्रात २८ डिसेंबरपासून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत प्रात्यक्षिक दाखविण्याचा कार्यक्र म सुरू झाला आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
सर्वपक्षीय नेत्यांनी या वेळी ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे मतदान करून आपले मत योग्य ठिकाणी पडले की नाही, याची खात्री करून घेतली.

व्हीव्हीपॅट मशिनची पनवेल तालुक्यात प्रात्यक्षिके
पनवेल : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका व्हीव्हीपॅट मशिनद्वारे घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे व्हीव्हीपॅट मशिनबाबत मतदार राजाच्या माहितीसाठी व जनजागृतीसाठी विहिघर, बोनशेत, भोकर पाडा, कोप्रोली, चिपळे या गावांमध्ये व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली, या वेळी हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.
व्हीव्हीपॅट मशिनची उपयुक्तता व योग्यता नागरिकांना सांगण्यात आली. या वेळी पथक प्रमुख म्हणून पनवेल मंडळ अधिकारी संदीप रोडे, तलाठी अमोल घरत, कविता माने, अंकिता जोंधळे व सुनील पाटील उपस्थित होते. अशीच प्रात्यक्षिके इतर गावांमध्ये देखील दाखविली जाणार आहेत.

Web Title:  E.V.M., VVPAT Public awareness in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Karjatकर्जत