ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन वापरासंदर्भात जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:04 AM2019-04-22T01:04:29+5:302019-04-22T01:04:42+5:30
तहसीलदार सचिन शेजाळे व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन वापरासंदर्भात माहिती सांगितली.
अलिबाग : संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याची प्रणाली लागू करण्यात आली आहे. याच आधारे नुकताच जिल्हा न्यायालय अलिबाग येथे सर्व न्यायिक अधिकारी, वकील तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदान करण्याविषयी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळे व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन वापरासंदर्भात माहिती सांगितली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान यंत्रावर (बॅलेट युनिट) १६ उमेदवार आणि एक ‘नोटा’ (कुणीही उमेदवार योग्य नाही) या पर्यायाकरिता व्यवस्था असल्याची माहिती देत रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण उमेदवार १६ असल्याने दोन मतदान यंत्रे वापरावी लागणार असल्याची माहिती दिली. पहिल्या बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे, फोटो व चिन्ह असणार आहे, तर दुसºया बॅलेट युनिटमध्ये केवळ ‘नोटा’ हा पर्याय राहणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी संपूर्ण लोकसभा निवडणूक प्रक्रिया बिनधोक होण्याकरिता वापरात येणाºया ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन वापरासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत जागृतीपर कार्यक्र म घेण्यात आला.
या वेळी जिल्हा विधि प्राधिकरण रायगड अलिबाग सचिव व दिवाणी न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आलेली मतदान जागृतीविषयक क्लिप सर्वांना दाखविण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व न्यायिक अधिकारी उपस्थित होते.