मुरुड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, हरवलेल्या मुलाला शोधून काढण्यात मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:44 AM2017-12-18T01:44:57+5:302017-12-18T01:45:17+5:30
न सांगताच घरातून गायब होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून, हरवलेल्या लोकांना शोधून काढण्याची आता पोलिसांवर जबाबदारी येऊन पडली आहे.
मुरुड जंजिरा : न सांगताच घरातून गायब होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून, हरवलेल्या लोकांना शोधून काढण्याची आता पोलिसांवर जबाबदारी येऊन पडली आहे.
मुरुड शहरालगत विहूर ग्रामपंचायतीमध्ये राहणारे महेश सुदाम कदम यांचा १५ वर्षांचा मुलगा इयत्ता दहावीमध्ये शिकत असून, अभ्यास वेळच्या वेळी करत नसल्याने पालक ओरडल्यामुळे याचा मनात राग ठेवून एक दिवस तो त्याच्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला. सायंकाळ झाली तरी मुलगा घरात न आल्याने या मुलाचे पालक चिंताग्रस्त होऊन त्यांनी मुरु ड पोलीस ठाणे गाठले व घडलेली सर्व हकिकत सांगून आमच्या मुलाचा शोध घेण्याची विनंती केली. वेळ न घालवता मुरु ड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून मुरु ड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे बस थांबे, शाळा, विक्र म रिक्षा स्थानक आदी भागात कसून चौकशी करण्यास सुरुवात केली.
चौकशी करता करता बसस्थानकातील मुरु ड भालगाव मार्गे रोहा या गाडीत हा मुलगा बसलेला त्यांना दिसून आला. तातडीने या मुलास मुरु ड पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून त्याची चांगल्या पद्धतीने समजूत घालून
सदरचा मुलगा वडिलांकडे देण्यात आला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतरावर मुरु ड पोलिसांनी सजगता दाखवत मुलगा शोधून
काढल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक विजय गोडसे म्हणाले की, सदरचा मुलगा अभ्यासाला कंटाळून घरातून न सांगताच निघून गेला होता. आम्ही त्याचे चांगले प्रबोधन केले असून
आई-वडील हे तुझ्या भल्यासाठीच ओरडत आहेत. अभ्यासावर
लक्ष केंद्रित कर असा सल्लाही या वेळी दिल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा त्वरित सापडल्याने मुलाच्या आई-वडिलांनी मुरुड पोलिसांचे आभार मानले आहे.