जादा बसेसची मागणी

By admin | Published: September 30, 2015 12:10 AM2015-09-30T00:10:51+5:302015-09-30T00:10:51+5:30

नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमध्ये वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि याच गर्दीचा फायदा

Excess buses demand | जादा बसेसची मागणी

जादा बसेसची मागणी

Next

उरण : नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमध्ये वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि याच गर्दीचा फायदा उठवित बसमध्येच होत असलेल्या पाकीटमारीच्या वाढत्या घटनांमुळे उरण - वाशी मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. विशेषत: विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान उरण - वाशी मार्गावर जादा बसेस सुरू करण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे.
नवी मुंबई परिवहन सेवा उरणकरांसाठी उपयुक्त ठरु लागली आहे. या सेवेचा लाभ बहुतांश उरणकर घेत आहेत. उरणमध्ये उच्च आणि तांत्रिक शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थिनी, महिला उरण - वाशी या मार्गावर प्रवास करीत आहेत. यामध्ये विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. उरण - वाशी - कोपरखैरणे दरम्यान नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेस प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाशी बस स्थानकात कोपरखैरणे येथून येणाऱ्या बसेस याआधीच हाऊसफूल्ल असतात. त्यामुळे वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना वाशी स्थानकापासून उरणपर्यंत उभ्याने प्रवास करण्याची पाळी येते.
बसमध्ये चढ - उतार आणि प्रवासादरम्यान मुली, महिला, विद्यार्थिनींना धक्काबुक्कींचाही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गर्दीचा गैरफायदा घेत महिलांना धक्काबुक्की होत आहे. बसमध्ये होत असलेल्या पाकीटमारीच्या घटनांचाही कटू अनुभव घेण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे नागरिकांची या त्रासापासून सुटका करण्यासाठी उरण - वाशी मार्गावर जादा बसेस सोडण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे.

Web Title: Excess buses demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.